दिल्ली - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यांच्या आणि जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. मात्र, तरीही नागरिक बंद असलेल्या सीमांमधून प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. दिल्लीत संतप्त नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केला.
हे नागरिक पालम विहारमधून गुरुग्राम परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. गुरुग्राम पोलिसांना या नागरिकांना विरोध करताच सलाहपूरचे निवासी असलेल्या या नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. या हल्ल्यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.