पाटना - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरातील उद्योग व्यवसाय ठप्प आहेत. मात्र, यातून अत्यावश्यक गोष्टींना वगळण्यात आले आहे. फळे विक्रेत्यांनाही लॉकडाऊनमधून सुटका देण्यात आली आहे. मात्र, नागरिक घरांमध्ये अडकून पडल्यांमुळे फळ व्यावसायिकांचा धंदा कमी होत आहे. छोटे मोठे सर्वच फळ व्यावसायिक मंदीच्या गर्तेत सापडले आहेत.
देशातील सर्व व्यापार, व्यवसाय, उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे अनेक नागरिक आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. अशा परिस्थीत ग्राहकही कमी झाले आहेत. एकट्या पाटना फळबाजाराला 15 कोटींचे नुकसान झाले आहे.
विक्री कमी झाल्याने फळे सडून चालले आहेत
ग्राहक कमी झाल्याने बाजारातील फळे सडून चालली आहेत. त्यामुळे व्यापारी आणि छोट्या दुकानदारांचे नुकसान होत आहेत. त्यामुळे या विक्रेत्यांना कुटुंब कसे चालवालयचे असा प्रश्न सतावत आहे.
काय म्हणत आहेत फळ विक्रेते
20 एप्रिलनंतर सरकारने लॉकडाऊनपासून थोडी सूट दिली आहे. काही कार्यालये सुरू झाली आहे. मात्र, कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी नागरिक घराबाहेर पडत नाहीत. माल मिळण्यास काही अडचण येत नाही, मात्र, ग्राहक कमी झाले आहेत.