नवी दिल्ली - जगातला सर्वात भव्य पुतळा असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या गॅलरीला पहिल्या पावसाळ्यातील पहिल्याच पावसात गळती लागली आहे. या गॅलरीत पावसाच्या पाण्याचं तळं झालं आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले नेते सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा पुतळा आहे. ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी या पुतळ्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. पुतळा तयार करण्यासाठी तब्बल २ हजार ९८९ कोटींचा खर्च आला आहे. पुतळ्याच्या गॅलरीत गळती लागल्याने पर्यटकांमध्ये नाराजी आहे. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
What a shame Mr. PM, first they snatched #patel from Congress and then made him a ₹3000 statue. This is only the beginning of their lies. Watch this video to know the exact condition of #StatueOfUnity @PMOIndia @narendramodi @BJP4India @smritiirani @AmitShah @nsitharaman pic.twitter.com/Aqvao1VSHw
— Praveen Kumar P J (@pkpj) June 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">What a shame Mr. PM, first they snatched #patel from Congress and then made him a ₹3000 statue. This is only the beginning of their lies. Watch this video to know the exact condition of #StatueOfUnity @PMOIndia @narendramodi @BJP4India @smritiirani @AmitShah @nsitharaman pic.twitter.com/Aqvao1VSHw
— Praveen Kumar P J (@pkpj) June 29, 2019What a shame Mr. PM, first they snatched #patel from Congress and then made him a ₹3000 statue. This is only the beginning of their lies. Watch this video to know the exact condition of #StatueOfUnity @PMOIndia @narendramodi @BJP4India @smritiirani @AmitShah @nsitharaman pic.twitter.com/Aqvao1VSHw
— Praveen Kumar P J (@pkpj) June 29, 2019
गुजरातमध्ये नर्मदा धरणाजवळच्या साधू बेटावर हा पुतळा उभारण्यात आला आहे. लार्सन अॅण्ड टुब्रो आणि राज्य सरकार संचलित सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडवर पुतळा उभारणीची जबाबदारी होती. स्टॅच्यू ऑफ युनिटी' हा जगातील सर्वात उंच पुतळा असून तो कमी वेळेत तयार करण्यात आला आहे. पुतळ्याची उंची ही न्यूयॉर्कच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या जवळपास दुप्पट आहे. तसेच चीनमधील गौतम बुद्धांच्या स्प्रिंग टेंपल येथील पुतळ्यापेक्षाही उंच आहे. या पुतळ्याचा देखभाल करण्यासाठी दिवसाला १२ लाख रुपयांचा खर्च येतो. याचे ताजमहालच्या प्रवेश शुल्काहून सातपट अधिक महाग प्रवेश शुल्क आहे. असे असूनही याच्या बांधकामात काही उणिवा राहिल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पुतळ्याच्या गॅलरीच्या छतामधून पाण्याची गळती होत आहे.
गॅलरीच्या काही कोपऱ्यांमधून पाणी पुतळ्याच्या गॅलरीत आलं आहे. मात्र हा काही आमचा दोष नाही, वेगवान वाऱ्यामुळे हे पाणी आले. या गॅलरीची रचानाच पर्यटकांना मनोरम दृश्यांचा आनंद घेता यावा यासाठी केली आहे. ज्या ठिकाणाहून पाणी आले त्या जागा झाकण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत, असेही स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या ट्विटर अकाऊंटवरून सांगण्यात आले आहे.
मागील दोन दिवसांपासून गुजरात, महाराष्ट्र या ठिकाणी पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबईत तर शुक्रवारी झालेल्या पावसाने दाणादाण उडवली. लोकल सेवा आणि रस्ते वाहतूक या दोन्हींवर परिणाम झाला. आता आज स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात ऐक्याचे प्रतीक असलेला सरदार पटेल यांच्या भव्य पुतळ्याच्या गॅलरीत पावसाचे पाणी शिरले आहे.