ETV Bharat / bharat

कोविड-१९: कोटा येथे अडकलेल्या झारखंडमधील विद्यार्थ्यांची विशेष रेल्वेने घरवापसी - झारखंड

गृह मंत्रालयाने राज्यांना आपल्या मजुरांना, विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना बस आणि विशेष ट्रेनच्या सहाय्याने इतर राज्यातून परत आणण्याची परवानगी दिली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ही कारवाई केली आहे. या वेळी रेल्वे स्थानकावर विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी रांचीचे उपायुक्त राय महिमापत रे, वरिष्ठ पोलीस अधीक्षक अनिश गुप्ता आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

Special train carrying around 1,200 students
झारखंडमधील विद्यार्थी
author img

By

Published : May 3, 2020, 11:34 AM IST

रांची (झारखंड)- कोरोनामुळे देशातील बरेच विद्यार्थी राजस्थानच्या कोटा या शहरात अडकले आहेत. विद्यार्थ्यांना आपल्या राज्यात परत आणण्यासाठी विविध राज्यांकडून प्रयत्न केले जात आहे. राज्यातील १ हाजार २०० विद्यार्थी देखील कोटा येथे अडकले होते. या विद्यार्थ्यांना विशेष ट्रेनने राज्यात वापस आणण्यात आले आहे. ही ट्रेन काल रात्री ७ च्या सुमारास राचीच्या हतिया रेल्वे स्थानकावर पोहोचली होती, अशी माहिती राचीचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज अम्बस्त यांनी सांगितले.

गृह मंत्रालयाने राज्यांना आपल्या मजुरांना, विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना बस आणि विशेष ट्रेनच्या सहाय्याने इतर राज्यातून परत आणण्याची परवानगी दिली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ही कारवाई केली आहे. या वेळी रेल्वे स्थानकावर विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी रांचीचे उपायुक्त राय महिमापत रे, वरिष्ठ पोलीस अधीक्षक अनिश गुप्ता आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांनी फूल, पाणी आणि जेवणाचे पॅकेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. वापस आणलेल्या विद्यार्थ्यांमधील जवळपास ३०० विद्यार्थ्यी हे रांची शहरातील आहेत. राज्यात वापस आल्यानंतर विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे, असे एका विद्यार्थिनीने गहीवरत प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा- भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या ४० हजारांच्या जवळ; १ हजार ३०१ दगावले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.