ETV Bharat / bharat

ईटीव्ही भारत विशेष : 'कोरोना संकटातही भारत गाठणार पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष' - सिटिझन अमेंडमेंट एक्ट

देशात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. यावर उपाय म्हणून केंद्र आणि राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधी अनामिका रत्ना यांनी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांच्याशी कोरोना संकट आणि इतर मुद्द्यांविषयी घेतलेली ही खास मुलाखत...

special-interview-with-ram-madhav-national-general-secretary-of-bjp
राम माधव
author img

By

Published : Jun 4, 2020, 2:20 PM IST

नवी दिल्ली - कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर 2025पर्यंत भारत पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्याचे लक्ष्य निश्चितपणे गाठेल, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलनाता व्यक्त केला. सीमेवर चीनसोबत सध्या वादाचे वातावरण आहे. चीनच्या नेतृत्वावर बाह्यदबाव आहे. चीनमध्ये देखील कोरोना आणि त्याच्या व्यवस्थापनाविषयी जनतेचा संताप आहे असेही ते म्हणाले.

लडाखमधील चिनी सैनिकांच्या कारवायांबाबत राम माधव म्हणाले की, अंतर्गत आणि बाह्य तणावामुळे अशी घटना घडविली जात आहे. तथापि, ही राजकीय विश्लेषणाची बाब आहे. मात्र, आम्हाला सीमेवर शांतता हवी आहे. अशी आमची प्राथमिकता नेहमीच राहिली आहे. 'शांततेसाठी आपण कोणतेही मूल्य देऊ, त्यासाठी आपण तयार नाही.' असे आता आमचे नवीन धोरण स्पष्ट झाले आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राम माधव यांची मुलाखत...

प्रश्न - कोरोना संकटाच्या काळात या सरकारची सर्वात मोठी कामगिरी कोणती आहे?

- तसे, मोदी सरकारच्या भाग -२ च्या कार्यकाळात बरेच मोठे यश आमच्या खात्यात आहे. यात सरकारने आणलेल्या आर्थिक क्षेत्रातील बर्‍याच महत्त्वपूर्ण सुधारणांचा समावेश आहे. शेतकरी व गरीबांसाठी अनेक कल्याणकारी योजना आहेत. समाजकल्याण आणि महिलांच्या कल्याणासाठी तसेच गरीब आणि कामगारांच्या कल्याणासाठी सरकारने कार्य केलेले आहेच. शिवाय, मोदी सरकारने खास करून मुस्लीम महिलांच्या हितासाठी ट्रिपल तलक कायदा किंवा ट्रान्सजेंडर कायद्यासह अनेक योजना आणल्या आहेत. तसेच सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

राष्ट्रीय एकता लक्षात घेऊन कलम 370 आणि 35 अ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यांतर्गत बाहेरून येणाऱ्या निर्वासितांना नागरिकत्व देण्याची बाब आहे. सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही सरकारने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या लक्ष्याकडे नेण्यासाठी बरेच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

प्रश्न - कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारत पाच अब्ज डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठू शकेल ?

- आम्ही पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहोत. कोरोनाने अर्थव्यवस्थेत मंदी आली आहे. परंतु, ती मंदी केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगात आहे. असे असूनही, आम्ही 2025पर्यंत 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था पार करू शकू का, हा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होणार आहे. परंतु, भारत 2030 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था नव्हे तर, 10 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठेल.

प्रश्न - अधिकाधिक घरगुती वस्तू आणि आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी चीनी बाजारपेठवर बंदी घालण्यासाठी कोरोना संकट हा सुवर्णकाळ आहे?

- आत्मनिर्भर तत्त्वानुसार, सरकारने पार्ट वनपासूनच काम सुरू केले होते. आत्मनिर्भरतेसाठी मोदींनी व्यवसाय करण्याकरिता मुद्रा योजना, स्टार्ट अप इंडिया, स्टॅण्ड अप इंडिया अशा योजना आणल्या आहेत. त्याद्वारे आपण आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करू शकू. आपल्या देशात जीन्स पँट बनवायचो, पण त्यात वापरली जाणारी चेन भारतात बनत नव्हती. यापूर्वी भारतात अशा सामान्य गोष्टींबद्दल कधीही विचार केला नव्हता. त्यामुळे पंतप्रधानांनी आत्मनिर्भरतेच्या मार्गावर पुढे जाण्याचे आवाहन केले. आत्मनिर्भरतेचा अर्थ असा नाही की, आपण जगापासून विभक्त होऊ आणि आपल्या घरात बसू. परंतु, आज आत्मनिर्भर म्हणजे, आपण स्वतःच्या पायावर उभे राहू आणि स्वदेशी आपला आधार असेल आणि 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेसाठी आपण जगात असू आणि पुढे जाऊ.

प्रश्न - काश्मीरमधील परिस्थिती सामान्य होण्यासाठी तेथे राजकीय घडामोडी वाढल्या पाहिजेत, असा तुमचा विश्वास आहे का? ओमर अब्दुल्लाची सुटका झाली आहे. परंतु मेहबुबा मुफ्ती अजूनही अटकेत आहेत.

- काश्मीरमध्ये उमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती हेच फक्त राजकारणी नाहीत. तेथे हजोरो नेते आहेत. सर्व पक्षांचे नेते आहेत. कॉंग्रेसचा एकही नेता तुरुंगात नाही. तिथे काँग्रेस राजकीय काम का सुरू करत नाही. नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीचे काही नेते वगळता सर्व जण मोकळे आहेत. ते राजकीय कामकाज सुरू करू शकतात. आज त्या राज्यातील परिस्थिती अशी आहे की, कलम 370 हटवण्याचा विषय राज्यातील जनतेने स्वीकारला आहे. पण तेथील नागरिकांना दररोज बर्‍याच समस्या येतात. त्या सोडविण्यासाठी त्यांचे नेते उपस्थित रहावे लागतील. पण आज सर्वच पक्षांचे नेते घरात बसले आहेत. फक्त एक भाजपा वगळता अन्य पक्षांचे नेते कोणतेही राजकीय कार्य करत नाहीत. त्यामुळे इतरांनीही बाहेर येऊन आपला राजकीय कारभार सुरू करावा, असे आमचे आवाहन आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नवीन यंत्रणा चालविली पाहिजे.

प्रश्न - चीनच्या सीमेवरील वादाबद्दल तुमचे काय म्हणणे आहे?

- तथ्य नसलेल्या बातमीवर विश्वास ठेवू नका, अंतर्गत अडचणीमुळे चीन आक्रमक झाला आहे. भारत आणि चीन दरम्यान 3 हजार 500 किमी लांबीची सीमा आहे. इथल्या काही भागांत नेहमीच तणाव निर्माण झाला आहे. आता चीन अधिक आक्रमक दिसत आहे. परंतु एक गोष्ट अशी आहे की, यावेळी अनेक प्रकारचे व्हीडिओ येत आहेत, बर्‍याच बातम्या येत आहेत, सोशल मीडियावरही असे रिपोर्ट्स येत आहेत. जोपर्यंत सरकार काहीही बोलत नाही, तोपर्यंत अशा सोशल मीडियावरील बातम्यांवर विश्वास ठेवू नये.

स्थलांतरित मजुरांवर राजकारण करणे दुर्दैवी..

- भारतात सुमारे आठ कोटी स्थलांतरित कामगार आहेत. त्यापैकी केवळ 70-90 लाख लोक बाहेर पडले. हे मजूर जिथे आहेत तितेच रहावे, असे आम्हाला वाटत होते. मात्र, चिंता आणि भीतीमुळे काही लोक गावाकडे निघून गेले. पण ही संख्या वाढताच आम्ही ट्रेनची व्यवस्था केली. त्याची संख्या वाढवली. लॉकडाऊन करणे आवश्यक होते, यात जर उशीर झाला असता तर आज अमेरिकेसारख्या देशात दीड लाख रुग्ण आहेत. एक लाखाहून अधिक लोक तिथे मरण पावले आहेत. अशी भारतातही स्थिती झाली असती. भारताची लोकसंख्या जगातील लोकसंख्येच्या 15 टक्के आहे. भारतात एक लाखांपेक्षा कमी सक्रिय कोरोना प्रकरणे आहेत. मृतांचा आकडा सुमारे सहा हजार आहे. या लॉकडाऊनमुळे आपण आपला देश किती वाचवला आहे, हे समजले पाहिजे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.