ETV Bharat / bharat

पाकिस्तानच्या दुतावासातील कर्मचारीच निघाले हेर; गुन्हा दाखल - पाकिस्तान दुतावास दिल्ली

स्पेशल सेलला पाकिस्तानच्या दुतावासातील काही कर्मचारी हेरगिरी करत असल्याचा संशय होता. आयएसआयच्या इशाऱ्यावर हे कर्मचारी हेरगिरी करत असल्याची माहिती स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांना मिळाल्याने त्यांनी या कर्मचाऱ्यांवर पाळत ठेवली.

police
दिल्ली पोलीस कार्यालय
author img

By

Published : Jun 1, 2020, 1:21 AM IST

नवी दिल्ली - पाकिस्तानच्या दुतावासातील तीन कर्मचारी भारतात हेरगिरी करत असल्याचे उघड झाले आहे. हे कर्मचारी पाकिस्तानच्या आयएसआय या संघटनेसाठी हेरगिरी करत असल्याचे स्पेशल सेलने उघड केले आहे. या तिन्ही कर्मचाऱ्यांना पाकिस्तानी दुतावासाने परत पाकिस्तानला जाण्याचे निर्देश दिले आहेत. दुतावासात तैनात असल्याने त्यांना अटक करण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला पाकिस्तानच्या दुतावासातील काही कर्मचारी हेरगिरी करत असल्याचा संशय होता. आयएसआयच्या इशाऱ्यावर हे कर्मचारी हेरगिरी करत असल्याची माहिती स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांना मिळाल्याने त्यांनी या कर्मचाऱ्यांवर पाळत ठेवली. दिल्लीतील करोलबागमध्ये हे कर्मचारी काही गोपनिय दस्तावेज घेण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी सापळा लावला. यावेळी गोपनिय दस्तावेज घेताना पोलिसांच्या स्पेशल सेलने त्यांना रंगेहात पकडले. या गोपनिय दस्तावेजाच्या बदल्यात या व्यक्तीला आयफोन आणि पैसे देण्यात येत होते.

बनावट आधारकार्डही केले जप्त

यातील एका कर्मचाऱ्याला पकडले असता, त्याने पोलिसांना आधारकार्ड दाखवले. यात त्याचे नाव नासिर गौतम असे नमूद करण्यात आले होते. मात्र त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आयएसआयच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे कबूल केले. पाकिस्तानी दुतावासात राहुन भारतीय सुरक्षा दलाविषयी माहिती गोळा करत असल्याची त्याने कबुली दिली. त्यांनी यावेळी त्याचा जावेद या चालक साथिदाराचीही माहिती पोलिसांना दिली. त्यावरुन जावेदलाही पकडण्यात आले. दरम्यान या कर्मचाऱ्या 24 तासात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.