ETV Bharat / bharat

लॉकडाऊन योग्यच! सोनिया गांधींनी पंतप्रधान मोदींना पत्र पाठवून सुचवले आणखी उपाय.. - sonia gandhi letter to pm

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी देशाला लॉकडाऊन करण्याच्या निर्णयाची स्तुती करत, आपणही यात सहभागी असल्याचे म्हटले आहे.

Sonia Gandhi writes to Modi praising the lock-down decision
Sonia Gandhi has written to Prime Minister Narendra Modi
author img

By

Published : Mar 26, 2020, 12:44 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी देशाला लॉकडाऊन करण्याच्या निर्णयाची स्तुती करत, आपणही यात सहभागी असल्याचे म्हटले आहे. तसेच, यादरम्यान सरकारने कोणती पावले उचलावीत याबाबतही त्यांनी मोदी सरकारला काही पर्याय सुचवले आहेत.

यामध्ये त्यांनी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उपाय करण्याची मागणी केली आहे. त्यांच्यासाठी तातडीने आणि मोठ्या प्रमाणात मास्क तसेच इतर वैद्यकीय साहित्य उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, सहा महिन्यांपर्यंत केंद्राने ईएमआय रद्द करावेत असेही त्यांनी सुचवले आहे. यासोबतच, या सहा महिन्यांसाठी बँकांकडून होणारी व्याज वसूलीही बंद करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

गोरगरीब आणि मजूरांसाठी 'न्याय' योजना लागू करून, त्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा करावी, तसेच शेतकरी आणि छोटे व्यापारी यांच्या मदतीसाठीही तातडीने पावले उचलावीत अशी मागणी सोनिया गांधींनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.