ETV Bharat / bharat

सोनिया गांधींनी तिहार तुरुंगात घेतली डी. के. शिवकुमारांची भेट - dk suresh briefs media

शिवकुमार यांचे बंधू आणि काँग्रेसचे आमदार डी. के. सुरेश यांनी या भेटीविषयी माहिती दिली. 'सोनिया यांनी संपूर्ण पक्ष तुमच्यासोबत असल्याचे शिवकुमार यांना सांगितले. हा गुन्हा दाखल करण्यामागे राजकीय हेतू आहे. अशाच प्रकारे इतर नेत्यांनाही लक्ष्य केले जात आहे,' असे सुरेश यांनी म्हटले आहे.

सोनिया गांधींनी तिहार तुरुंगात घेतली डी. के. शिवकुमारांची भेट
author img

By

Published : Oct 23, 2019, 11:25 AM IST

नवी दिल्ली - काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आज पक्षाचे कर्नाटकातील नेते आणि माजी मंत्री डी. के. शिवकुमार यांची आज भेट घेतली. त्यांच्यासह काँग्रेस नेत्या अंबिका सोनी होत्या. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनीही सोमवारी तिहारमध्ये शिवकुमार यांची भेट घेतली होती.

शिवकुमार यांचे बंधू आणि काँग्रेसचे आमदार डी. के. सुरेश यांनी या भेटीविषयी माहिती दिली. 'सोनिया यांनी संपूर्ण पक्ष तुमच्यासोबत असल्याचे शिवकुमार यांना सांगितले. हा गुन्हा दाखल करण्यामागे राजकीय हेतू आहे. अशाच प्रकारे इतर नेत्यांनाही लक्ष्य केले जात आहे. आम्हाला यातून बाहेर पडण्याचा उपाय शोधावाच लागेल,' असे सुरेश यांनी म्हटले आहे.

शिवकुमार यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) अवैध संपत्ती प्रकरणी ३ सप्टेंबरला अटक केली होती. त्यांचा जामीन अर्ज अद्याप न्यायालयात प्रलंबित असून त्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे.

शिवकुमार काँग्रेससाठी कर्नाटकातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनी कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस युती सरकार सुरळीत चालू ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

मागील महिन्यात सोनिया गांधींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची तिहार तुरुंगात जाऊन भेट घेतली होती. सध्या चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, ते अवैध संपत्ती प्रकरणात अद्याप ईडीच्या कोठडीत आहेत.

Intro:Body:

सोनिया गांधींनी तिहार तुरुंगात घेतली डी. के. शिवकुमारांची भेट घेणार

नवी दिल्ली - काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आज पक्षाचे कर्नाटकातील नेते आणि माजी मंत्री डी. के. शिवकुमार यांची आज भेट घेतली. त्यांच्यासह काँग्रेस नेत्या अंबिका सोनी होत्या. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनीही सोमवारी तिहारमध्ये शिवकुमार यांची भेट घेतली होती.

शिवकुमार यांचे बंधू आणि काँग्रेसचे आमदार डी. के. सुरेश यांनी या भेटीविषयी माहिती दिली. 'सोनिया यांनी संपूर्ण पक्ष तुमच्यासोबत असल्याचे शिवकुमार यांना सांगितले. हा गुन्हा दाखल करण्यामागे राजकीय हेतू आहे. अशाच प्रकारे इचर नेत्यांनाही लक्ष्य केले जात आहे. आम्हाला यातून बाहेर पडण्याचा उपाय शोधावाच लागेल,' असे सुरेश यांनी म्हटले आहे.

शिवकुमार यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) अवैध संपत्ती प्रकरणी ३ सप्टेंबरला अटक केली होती. त्यांचा जामीन अर्ज अद्याप न्यायालयात प्रलंबित असून त्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे.

शिवकुमार काँग्रेससाठी कर्नाटकातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनी कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस युती सरकार सुरळीत चालू ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

मागील महिन्यात सोनिया गांधींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची तिहार तुरुंगात जाऊन भेट घेतली होती. सध्या चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, ते अवैध संपत्ती प्रकरणात अद्याप ईडीच्या कोठडीत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.