ETV Bharat / bharat

बायडेन-हॅरिस यांना सोनिया गांधींनी दिल्या शुभेच्छा

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अमेरिकेचे नव नियुक्त राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. त्यासंदर्भात सोनिया गांधी यांनी दोघांनाही शुभेच्छाविषयक पत्र लिहले आहे.

US President-elect Joe Biden
बायडेन-हॅरिस यांना सोनिया गांधींनी दिल्या शुभेच्छा
author img

By

Published : Nov 8, 2020, 3:50 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि पहिल्या महिला उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचे अभिनंदन केले आहे. सोनिया गांधी यांनी अभिनंदनासंदर्भात दोघांनाही पत्र लिहले आहे. त्यामध्ये गांधी म्हणाल्या की, अमेरिकन निवडणुकीच्या प्रचारामध्ये बायडेन यांच्या भाषणांमध्ये सामाजिक आणि वैश्विक विकासाचे धोरण हे लोकांना दिलासा देणारे होते.

लोकशाही आणि मानवतेची मूल्ये अधिक मजबूत-

तसेच हॅरिस यांचा हा विजय कृष्णवर्णीय अमेरिकन नागरिक आणि तिथे राहणाऱ्या भारतीयांचा असल्याचे म्हणत सोनियांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. अमेरिकेच्या संविधानाने घालून दिलेल्या मुलभूत सिंद्धांताचा हा विजय आहे. आपल्या निवडीने लोकशाही आणि मानवतेची मूल्ये अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वासही सोनिया गांधी यांनी व्यक्त केला आहे.

बायडेन आणि हॅरिस यांच्या नेतृत्वात अमेरिका आणि भारत यांच्यामधील संबंध अधिक घट्ट होतील, याच माध्यमातून जगभरात विकासाला चालना देण्याबरोबरच शांती प्रस्थापित करण्यासाठी चालणा मिळेल, असा विश्वासही सोनिया गांधी यांनी पत्रातून व्यक्त केला आहे.

भारत अमेरिकेचे संबंध पूर्वीप्रमाणेच दृढ राहतील-

गेल्या वर्षभरापासून जगभरातील कोट्यवधी लोकांसह भारतीय नागरिक देखील अमेरिकेच्या निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत करून होते. आम्हाला विश्वास आहे की, भारत आणि अमेरिका यापुढेही पूर्वीप्रमाणेच दोन्ही देशातील नागरिकांच्या हितासाठी एकत्र काम करतील, असा विश्वासही सोनिया गांधी यांनी या अभिनंदन पत्रातून व्यक्त केला आहे.

व्यापार, बाजार, शिक्षण, तंत्रज्ञान आणि संरक्षणाच्या माध्यमातून अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध मजबूत झाले आहेतच. तसेच बिडेन यांच्या परिपक्व नेतृत्वाखाली अमेरिका भारत या दोन्ही देशासह जगभरात शांती आणि विकासासाठी फायदेशीर ठरेल अशा भविष्यातील भागीदारीची अपेक्षाही सोनिया यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.