नवी दिल्ली - 1965 च्या युद्धामध्ये हुतात्मा झालेल्या जवानाच्या 82 वर्षिय पत्नीने 2 लाख रुपयांची रक्कम 'पंतप्रधान सहाय्यता निधीम'ध्ये जमा केली. सीडीएसचे प्रमुख बिपीन रावत यांनी शनिवारी या महिलेचे कौतुक केले आणि आपल्यापुढे हा खूप मोठा आदर्श असल्याचे सांगत त्यांनी भारितायांना मदत करण्याचे आवाहन केले.
दर्शनी देवी या महिलेचे पती लष्करामध्ये हवालदार या पदावर कार्यरत होते. ते पाकिस्तान विरुद्ध झालेल्या 1965 च्या युद्धामध्ये हुतात्मा झाले होते. उत्तराखंडच्या दर्शना देवींनी 2 लाख रुपयांचा निधी आपल्या अगस्तमुनी या गावातील प्रशासनाकडे सुपूर्द केला.
बिपीन रावत म्हणाले, दर्शना देवींचा आम्हाला अभिमान वाटतो. त्यांनी आपल्यापुढे खूप चांगला आदर्श निर्माण केला आहे. देशातील प्रत्येक नागरिकाल मदत देता येत नसेल तर ठीक आहे. मात्र, किमान कर वेळेच्या वेळी भरा, तो बुडवू नका.