ETV Bharat / bharat

भाजप आज फुंकणार प्रचाराचे रणशिंग; उत्तर प्रदेशातील सर्व ८० जागांवर एकाच वेळी सभा - Modi

भाजपच्या विजय संकल्प सभेमध्ये पक्षाचा कोणता ना कोणता नेता, केंद्रीय किंवा राज्य मंत्री आवर्जून उपस्थित राहणार आहेत. आज होणाऱ्या सभेमध्ये पक्षाध्यक्ष अमित शाहा आगरा येथे हजेरी लावतील. तर, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह लखनऊ, मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ सहारनपूर तसेच उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य लखमपुरखीरी आणि इटावा येथे सभेला संबोधित करतील.

अमित शाह, राजनाथ सिंह आणि योगी आदित्यानाथ
author img

By

Published : Mar 24, 2019, 8:45 AM IST

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्ष आपली संपूर्ण शक्ती झोकून तयारी करत आहेत. सध्या सत्तेत असलेल्या भाजपचा डोळा देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशवर लागून आहे. त्यावरूनच 'विजय संकल्प सभा' नावाखाली भाजप उत्तर प्रदेशातून आपल्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. आज राज्यातील सर्वच ८० जागांवर भाजप एकाच वेळी ही सभा घेणार आहे.

भाजपच्या विजय संकल्प सभेमध्ये पक्षाचा कोणता ना कोणता नेता, केंद्रीय किंवा राज्य मंत्री आवर्जून उपस्थित राहणार आहेत. आज होणाऱ्या सभेमध्ये पक्षाध्यक्ष अमित शाहा आगरा येथे हजेरी लावतील. तर, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह लखनऊ, मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ सहारनपूर तसेच उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य लखमपुरखीरी आणि इटावा येथे सभेला संबोधित करतील.

सकल्प सभेमध्ये हे नेते सरकारच्या ५ वर्षातील विविध कामांचा उल्लेख करतील. तर, विरोधीपक्षावरही हल्लाबोल चढवणार आहेत. तर भाजपचे ७४ प्लसचे लक्ष्य यशस्वी करण्यासाठी लोकांना मतदान करण्याचेही आवाहन करणार आहेत. केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज गौतमबुद्ध नगर, स्मृती ईराणी कानपूरमध्ये सभा करणार आहेत. केंद्रीय मंत्री उमा भारती कैराना येथे लोकांना संबोधित करतील. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल बरेली, मुख्तार अब्बास नकवी रामपूर येथे जनसभा घेणार आहेत.

यानंतर २५ मार्चला मथुरा आणि २६ ला मुरादाबाद, गोरखपूर आणि वाराणसी येथेही मोठ्या सभा घेण्याची भाजप तयारी करत आहे. भाजपला उत्तर प्रदेशामध्ये बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाच्या आघाडीचे मोठे आव्हाने आहे. मागच्या वेळी येथे झालेल्या पोट निवडणुकांमध्ये भाजपला याच आघाडीकडून मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या फुलपूर मतदार संघाचाही समावेश होता.

Intro:Body:

भाजप आज फुंकणार प्रचाराचे रणशिंग; उत्तर प्रदेशातील सर्व ८० जागांवर एकाच वेळी सभा

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.