ETV Bharat / bharat

काश्मीरमध्ये सरसकट मोबाईल एसएमएस सेवेसह सरकारी रुग्णालयातील इंटरनेट पूर्ववत

author img

By

Published : Jan 1, 2020, 1:25 PM IST

जम्मू काश्मीरमधील सर्व मोबाईल फोनची एसएमएस म्हणजेच संदेश वहन सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. याबरोबरच सरकारी रुग्णालयातील ब्राडबँड इंटरनेट सेवा सुरळीत करण्यात आली आहे.

sms restored in Kashmir
एसएमएस सेवा सुरू

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील सर्व मोबाईलची एसएमएस म्हणजेच मेसेज सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. याबरोबरच सरकारी रुग्णालयातील ब्राडबँड इंटरनेट सेवा सुरळीत करण्यात आली आहे. ५ ऑगस्टला जम्मू काश्मीर राज्याची स्वायत्ता काढून घेतल्यानंतर इंटरनेट सेवा, लँडलाईन आणि मोबाईल सेवा खंडित करण्यात आली होती. मात्र, मंगळवारी मध्यरात्री काही सेवा पूर्ववत करण्यात आल्या आहेत.

  • SMS services, Broad Band services in all govt. hospitals to be restored post midnight in #Kashmir.

    — DIPR-J&K (@diprjk) December 31, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
जम्मू काश्मीरमधे सर्वसामान्य जनतेसाठी अजूनही इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. लँडलाईन आणि पोस्ट पेड मोबाईल सेवा टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे. मात्र, इंटरनेट आणि प्री-पेड मोबाईल सेवा सुरक्षेच्या कारणास्तव अजूनही बंद ठेवण्यात आली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री सर्व सरकारी रुग्णालयातील इंटरनेट सेवा आणि मोबाईल मेसेज सेवा सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याचे जम्मू काश्मीर सरकारचे प्रवक्ते रोहित कंसल यांनी पत्रकारांना सांगितले.

Intro:Body:

काश्मीरमधील सर्व मोबाईलवरील एसएमएस सेवेसह सरकारी रुग्णालयातील इंटरनेट सेवा सुरू    

जम्मू - जम्मू काश्मीरमधील सर्व मोबाईल फोनची एसएमएस म्हणजेच संदेश वहन सेवा पुर्ववत करण्यात आली आहे. याबरोबरच सरकारी रुग्णालयातील ब्राडबँड इंटरनेट सेवा सुरळीत करण्यात आली आहे. ५ ऑगस्टला जम्मू काश्मीर राज्याची स्वायत्ता काढून घेतल्यानंतर इंटरेनेट सेवा, लँडलाईन आणि मोबाईल फोन सेवा खंडित करण्यात आल्या होत्या, मात्र मंगळवारी मध्यरात्री काही सेवा पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत.

जम्मू काश्मीरमधे सर्वसामान्य जनतेसाठी अजूनही इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. लँडलाईन आणि पोस्ट पेड मोबाईल सेवा टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरळीत करण्यात आली.

३१ डिसेंबरच्या रात्री सर्व सरकारी रुग्णालयातील इंटरनेट सेवा आणि मोबाईल मेसेज सेवा सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याचे जम्मू काश्मीर सरकारचे प्रवक्ते रोहित कंसल यांनी पत्रकारांना सांगितले. इंचरनेट आणि प्रि पेड मोबाईल सेवा सुरक्षेच्या कारणास्तव अजूनही बंद ठेवण्यात आली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.