ETV Bharat / bharat

सुरेंद्र सिंहच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार - स्मृती इराणी - अमेठी

सुरेंद्र सिंह यांच्या कुटुंबासमोर मी या गोष्टीचा संकल्प केला आहे. मी दोषींना कठोरात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन स्मृती इराणी यांनी दिले आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
author img

By

Published : May 26, 2019, 9:50 PM IST

अमेठी - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या जवळचे असलेले सुरेंद्र सिंह यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यावर स्मृती इराणी म्हणाल्या, सुरेंद्र सिंह यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी आहे.

अंत्यसंस्कार झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या, मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची माझी तयारी आहे. सुरेंद्र सिंह यांच्या कुटुंबासमोर मी या गोष्टीचा संकल्प केला आहे. मी दोषींना कठोरात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांना दिले आहे.

स्मृती इराणी यांनी सुरेंद्र सिंहाच्या पार्थिवाला खांदा दिला. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

अशी झाली हत्या

सुरेंद्र प्रताप सिंह विवाह समारंभ उरकून आले होते. ते घराच्याबाहेर झोपले असताना अचानक एका अज्ञात मोटारसायकलस्वाराने गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. गंभीर अवस्थेत असलेल्या सुरेंद्र यांना रायबरेली येथील रुग्णालायत दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना ट्रॉमा सेंटरला नेण्यास सांगितले. परंतु, वाटेतच सुरेंद्र सिंह यांचा मृत्यू झाला.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.