अमेठी - स्मृती ईराणी यांचे निकटवर्तीय असेलेले सुरेंद्र प्रताप सिंह यांची काल गोळी झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मृती ईराणी यांनी यावेळी उपस्थित राहून त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला.
सुरेंद्र हे बरौलिया ग्रामपंचायतीचे सरंपच होते. त्यांची काल रात्री राहत्या घरात अज्ञात व्यक्तीने गोळी झाडून हत्या केली होती. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच स्मृती ईराणी या बरौलिया गावी पोहोचल्या. त्यांनी सुरेंद्र सिंह यांच्या कुटुबीयांचे सांत्वन केले. यावेळी अंत्ययात्रेदरम्यान ईराणी यांनी पार्थिवाला खांदाही दिला. सुरेंद्र हे स्मृती ईराणी यांचे निकटवर्तीय होते. यावेळी भाजप नेते मोहसिन रजा, राज्यमंत्री सुरेश पासी हेदेखील उपस्थित होते.