नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेवर काँग्रेसने खिल्ली उडवल्यानंतर त्यांनी सरळ पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना आव्हान दिले आहे. आपणाला काँग्रेस जितकी अपमानित करेल तितक्याच जोरदार आपण अमेठीमध्ये काँग्रेस विरोधात काम करणार, असे इराणी यांनी संतापून म्हटले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकांच्या शपथपत्रामध्ये त्यांनी आपली शौक्षणिक पात्रता १२वी नमूद केल्यामुळे काँग्रेसने त्यांची खिल्ली उडवली होती.
स्मृती इराणी अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. त्यांना राहुल गांधींचे मोठे आव्हान आहे. गुरवारी इराणी यांनी लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान त्यांनी आपल्या शपथपत्रामध्ये १२वी पर्यंतचे शिक्षण घेतल्याचे नोंदवले आहे. त्यामुळे काँग्रेसने एक पत्रकार परिषद घेऊन त्यांची खिल्ली उडवली होती. आता इराणी यांनी स्वतः समोर येत काँग्रेसला फैलावर घेतले.
-
#WATCH Union Minister Smriti Irani: In the last 5 years, they have attacked me in every which way possible. I only have one message for them, the more you will insult me, the more you will attack me, the harder I will work against Congress in Amethi. pic.twitter.com/ag3R9JV4yL
— ANI UP (@ANINewsUP) April 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH Union Minister Smriti Irani: In the last 5 years, they have attacked me in every which way possible. I only have one message for them, the more you will insult me, the more you will attack me, the harder I will work against Congress in Amethi. pic.twitter.com/ag3R9JV4yL
— ANI UP (@ANINewsUP) April 12, 2019#WATCH Union Minister Smriti Irani: In the last 5 years, they have attacked me in every which way possible. I only have one message for them, the more you will insult me, the more you will attack me, the harder I will work against Congress in Amethi. pic.twitter.com/ag3R9JV4yL
— ANI UP (@ANINewsUP) April 12, 2019
काँग्रेसने मला वेळोवेळी प्रताडीत आणि अपमानीत केले. त्यांना जमेल त्या पातळीवर उतरून त्यांनी माझा आपमान केला. मात्र, ते मला जितके अपमानीत करतील तितक्यात जोरदार आपण अमेठीमध्ये काँग्रेसविरोधात प्रचार करणार, असे म्हटले. इराणींच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात काय पडसाद उमटतात ते पाहण्यासारखे झाले आहे.
स्मृती इराणी यांनी २००४ आणि २०१४च्या निवडणुकांमध्ये पदवीचे शिक्षण घेतल्याचे नमूद केले होते. २००४मध्ये इराणी यांनी दिल्लीच्या चांदणी चौक येथून कपिल सिब्बल यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी आपण कला शाखेत पदवी घेतली आहे, असे सांगितले होते. २०१४च्या निवडणुकांमध्ये त्यांनी आपण बीकॉम केल्याचे निवडणूक आयोगाला सांगितले. तर, यंदा त्यांनी चक्क आपण केवळ १२वीचे शिक्षण घेतले, असे नमूद केले आहे. स्मृती इराणी यांच्यावर चुकीची शैक्षणिक पात्रता सांगितल्यावरुन दिल्लीच्या उच्च न्यायालायमध्ये गुन्हा दाखल आहे.