रायपूर - छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये सहा नक्षलवादी जखमी झाले, तर एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले. या चकमकीत, देशाचे दोन जवान हुतात्मा झाल्याची माहिती मिळाली आहे.
बीजापूरच्या पामेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज ही चकमक झाली. यात पोलिसांच्या 'कोब्रा २०४ बटालियन'चे सहा जवान जखमी झाले, तर दोन जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. जखमींमध्ये डेप्युटी कमांडर प्रशांत यांचाही समावेश आहे. त्यांची स्थिती नाजुक असल्याची माहिती मिळाली आहे.
या चकमकीमध्ये पोलीस शिपाई विकास आणि पुनानंद साहू हे दोघे हुतात्मा झाले.
हेही वाचा : विदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांचे आणखी एक शिष्टमंडळ करणार काश्मीर दौरा..