ETV Bharat / bharat

विशेष! राजस्थानातील पाणी संकटावर श्री कर्ण नरेंद्र कृषी विद्यापीठाने शोधला उपाय

राजस्थानची राजधानी जयपूरच्या जोबनेर भागात सुमारे 25 वर्षांपासून लोक पाण्याच्या संकटाशी झगडत होते. जोबनेर येथील श्री कर्ण नरेंद्र कृषी विद्यापीठात पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाला बाहेरून टँकर घ्यावे लागल होते. परंतु, अनेक वर्षांपासून या समस्येला सामोरे जाणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाला एक मार्ग सापडला आहे. ज्याद्वारे विद्यापीठाने केवळ पाण्याचा प्रश्नच सोडवला नाही तर आजूबाजूच्या गावांची पाण्याच्या संकटातून मुक्तता केली आहे.

shri karna narendra agricultural university solved water crisis in jobner area jaipur
राजस्थानातील पाणी संकटावर श्री कर्ण नरेंद्र कृषी विद्यापीठाने शोधला उपाय
author img

By

Published : Jul 15, 2020, 6:38 PM IST

जयपूर - राजस्थानला कायमच पाणीप्रश्नाने ग्रासले आहे. वाळवंटी आणि रेतीचा हा भाग असल्यामुळे येथील पाणीपातळी जमिनीत खोलवर जाते. पावसाचे प्रमाणही येथे कमी असल्यामुळे पाण्याच्या समस्यांना येथील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे येथील नागरिकांना त्याची किंमत जास्ती कळते. त्यामुळे ते पाणी जपून वापरतात. दरम्यान, पाणीपातळी वाढवण्यासाठी उपाय शोधण्यास जयपूरमधील श्री कर्ण नरेंद्र कृषी विद्यापीठाला यश आले आहे. यासंदर्भातला 'ई टीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट...

राजस्थानची राजधानी जयपूरच्या जोबनेर भागात सुमारे 25 वर्षांपासून लोक पाण्याच्या संकटाशी झगडत होते. जोबनेर येथील श्री कर्ण नरेंद्र कृषी विद्यापीठात पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाला बाहेरून टँकर घ्यावे लागल होते. परंतु, अनेक वर्षांपासून या समस्येला सामोरे जाणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाला एक मार्ग सापडला आहे. ज्याद्वारे विद्यापीठाने केवळ पाण्याचा प्रश्नच सोडवला नाही तर आजूबाजूच्या गावांची पाण्याच्या संकटातून मुक्तता केली आहे.

राज्यातील पश्चिम भागातील बाडमेर, जैसलमेर, बीकानेर येथे लोकांना अनेक किलोमीटरचा प्रवास करून पाणी आणावे लागत आहे. परंतु, आता राज्यातील इतर बरीच विभाग डार्क झोनमध्ये आली आहेत, त्यामुळे इतर जिल्ह्यांमध्येही सीमावर्ती भागाप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली आहे. जयपूरपासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या जोबनेर भागात परिस्थिती अधिकच खराब होती. येथे भूगर्भातील पाण्याची पातळी सतत घसरत होती. त्यामुळे येथील गावांना पिण्याच्या पाण्याचा सामना करावा लागत होता.

राजस्थानातील पाणी संकटावर श्री कर्ण नरेंद्र कृषी विद्यापीठाने शोधला उपाय

हेही वाचा - कोल्हापुरात बालविवाह रोखला; चौघांविरोधात लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा दाखल

'या' मार्गाने पाण्याच्या संकटावर केली मात -

पाणी साठवून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवली. स्वातंत्र्यापूर्वीपासून देशातील सर्वात जुने कृषी विद्यापीठ हे राजस्थानमधील जयपूर येथील जोबनेर परिसरात आहे. हे विद्यापीठ आता श्री कर्ण नरेंद्र कृषी विद्यापीठ म्हणून कार्यरत आहे. या विद्यापीठात विद्यार्थ्यांना पिकांबरोबरच प्राण्यांबद्दलही शिक्षण दिले जाते. परंतु, वर्षानुवर्षे विद्यापीठ प्रशासन पाणीटंचाईशी झगडत होते.

दरम्यान, या भागात पाण्याची पातळी वाढवण्यासाठी कृषी विद्यापीठाने प्रयत्न सुरू केले. पाणी साठवून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्याचे मुख्य कार्य करण्यात आले. त्यामुळे येथील भूगर्भातील पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. याचा फायदा श्री कर्ण नरेंद्र विद्यापीठासह या भागातील गावांना झाला आहे.

1995 पर्यंत परिसरातील पाणीपातळी पूर्णपणे संपली होती. 125 हेक्टरवर असलेल्या या विद्यापीठात 1985 पर्यंत पाण्याची कमतरता नव्हती. यादरम्यान विद्यापीठात दोन पिकेदेखील घेतली जात होती. परंतु 1985 नंतर या भागातील पाण्याची पातळी घसरत गेली. 1995 पर्यंत तर परिसरातील पाणी पूर्णपणे संपले होते. त्यानंतर सुमारे 25 वर्षे विद्यापीठाला टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था करावी लागत होती.

सांडपाण्याची तलावात केली साठवणूक -

आत्मनिर्भर होण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने जवळच्या ज्वाला माता मंदिराच्या टेकडीमधून वाहणारे सांडपाणी पालिकेच्या मदतीने तलावात साठवून ठेवले. विद्यापीठाने 33 लाख लीटर क्षमतेचे 3 तलाव तयार केले आहेत. तसेच 3 करोड लीटर क्षमतेचा आणखी एक तलाव विद्यापीठाने तयार केला आहे. तसेच आजूबाजूच्या परिसरात अनेक कच्चे तलावही बांधले आहेत.

वाया जाणाऱ्या पाण्याची साठवणूक कशी केली -

जे पाणी डोंगरावरून वाहून वाया जायचे ते प्रथम तलावामध्ये साठवले जाते. हे तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर ते ज्वाला सागरमध्ये सोडले जाते. यातील एका तलावातून विद्यापीठ स्वतः पाणी वापरते. या प्रयोगामुळे या भागातील भूजल पातळीत कमालीची वाढ झाली असून, यामुळे येथील पाणीप्रश्न सुटला आहे.

हेही वाचा - 'राज्यात लवकरच कौशल्य विकास विद्यापीठाची स्थापना होईल'

33 लाख लीटर क्षमतेचे तीन तलाव -

पाणी साठवण्यासाठी 33 लाख लीटरचे तीन तलाव तयार करण्यात आले आहेत. तसेच 3 करोड लीटरचा आणखी एक तलावही तयार करण्यात आला आहे. यासोबतच अनेक छोटे तलाव या भागात असून, ते सर्व पाण्याने भरलेले आहेत. यामुळे कृषी विद्यापीठ व परिसरातील गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला असल्याचे विद्यापीठाचे माजी अधिष्ठाताा जीएस बंगरवा यांनी सांगितले. या सर्व कार्यात बंगरवा यांचा मोलाचा वाटा आहे. या कार्यामुळे या भागातील पाणीपातळी 50 फुटापर्यंत वाढली आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे येथे सुरुवातीला शेती केली जात नव्हती. मात्र, आता येथील शेतकरी शेतीसुद्धा करत आहेत. बरोबरच बोअरवेलमध्येही पाणी आले असल्याचे बंगरवा यांनी सांगितले आहे.

पाण्याचे जतन करणे गरजेचे -

राजस्थानात पाण्याचे जतन करण्यासाठी आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. 295 पैकी 185 भाग हे ब्लॉक डार्क झोनमध्ये आहेत. 2013 मध्ये, 10 जून रोजी ही संख्या 164 होती, जी आता वाढून 185 झाली आहे. डार्क झोनमध्ये जाण्याचा अर्थ असा आहे की, त्या भागात भूगर्भाच्या खालून पाणी घेतले जात आहे, परंतु पाण्याची पातळी पुन्हा रिचार्ज होत नाही. त्यामुळे पाण्याचे जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.