ETV Bharat / bharat

विशेष श्रमिक रेल्वे या नियमित रेल्वे नव्हेत; आवश्यकतेनुसार त्यांच्या मार्गात बदल - यादव - स्थलांतरित कामगार न्यूज

20 ते 24 मेदरम्यान, उत्तर प्रदेश आणि बिहारला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेल्वे गाड्यांची मागणी करण्यात आली. देशभरातून 90 टक्के रेल्वे गाड्या या मार्गांवर सोडण्यात आल्या. या मार्गांवर प्रचंड गर्दी झाल्यामुळे येथील 71 रेल्वे गाड्या दुसरीकडे वळवल्या, असे यादव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

विनोद कुमार यादव
विनोद कुमार यादव
author img

By

Published : May 30, 2020, 12:06 PM IST

नवी दिल्ली - कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी सुरू झालेल्या रेल्वे भलतीकडेच जात असल्याचा आरोप होत आहे. त्यावर रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी शुक्रवारी स्पष्टीकरण दिले. आतापर्यंत सोडण्यात आलेल्या 3 हजार 840 विशेष श्रमिक रेल्वे गाड्यांपैकी केवळ 4 गाड्यांनी इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी 72 तासांहून अधिक वेळ घेतल्याचे ते म्हणाले. 20 ते 24 मेदरम्यान काही मार्गांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे केवळ 1.85% रेल्वे गाड्या दुसरीकडे वळवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

20 ते 24 मेदरम्यान, उत्तर प्रदेश आणि बिहारला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेल्वे गाड्यांची मागणी करण्यात आली. देशभरातून 90 टक्के रेल्वे गाड्या या मार्गांवर सोडण्यात आल्या. या मार्गांवर प्रचंड गर्दी झाल्यामुळे येथील 71 रेल्वे गाड्या दुसरीकडे वळवल्या, असे यादव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या 71 रेल्वे गाड्यांपैकी 51 बिहारला जाणाऱ्या, 16 उत्तर प्रदेशला जाणाऱ्या, 2 झारखंडला जाणाऱ्या आणि 1 आसाम आणि मणिपूरला जाणारी होती, असे ते म्हणाले.

अधिकृत माहितीनुसार, 36.5% विशेष श्रमिक रेल्वे गाड्या बिहारला, 42.2% उत्तर प्रदेशला पाठवण्यात आल्या. यामुळे या मार्गांवर मोठा ताण पडला. आतापर्यंत 52 लाख प्रवाशांना त्यांच्या इच्छित ठिकाणी पोहोचवण्यात आले आहे. मागील आठवड्यात 1 हजार 524 रेल्वेंच्या माध्यमातून 20 लाख प्रवाशांना सोडले आहे. आता विशेष श्रमिक रेल्वेंची मागणी कमी होत असल्याचे यादव म्हणाले. सध्या आमच्याकडे 449 रेल्वेंची मागणी आली आहे, असे ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.