भिलाई - प्लास्टिकमुक्त पर्यावरणाची निर्मिती करण्यासाठी छत्तीसगडच्या भिलाईमधील श्रद्धा साहू या गेल्या दोन वर्षांपासून अविरत मेहनत घेत आहेत. यासाठी त्यांनी क्रॉकरी बँक, म्हणजेच भांड्यांची बँक ही अभिनव संकल्पना राबवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून देशाला प्लास्टिकमुक्त करण्याची घोषणा केली, त्याच्याही कितीतरी आधीपासून श्रद्धा या प्लास्टिकमुक्तीसाठी काम करत आहेत.
नो टू सिंगल यूज प्लास्टिक : भिलाई शहरात अनोखी भांड्यांची बँक, पाहा खास रिपोर्ट
प्लास्टिकमुक्त पर्यावरणाची निर्मिती करण्यासाठी छत्तीसगडच्या भिलाईमधील श्रद्धा साहू या गेल्या दोन वर्षांपासून अविरत मेहनत घेत आहेत.
भिलाई - प्लास्टिकमुक्त पर्यावरणाची निर्मिती करण्यासाठी छत्तीसगडच्या भिलाईमधील श्रद्धा साहू या गेल्या दोन वर्षांपासून अविरत मेहनत घेत आहेत. यासाठी त्यांनी क्रॉकरी बँक, म्हणजेच भांड्यांची बँक ही अभिनव संकल्पना राबवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून देशाला प्लास्टिकमुक्त करण्याची घोषणा केली, त्याच्याही कितीतरी आधीपासून श्रद्धा या प्लास्टिकमुक्तीसाठी काम करत आहेत.
नो टू सिंगल यूज प्लास्टिक : भिलाई शहरात अनोखी भांड्यांची बँक, पाहा खास रिपोर्ट
भिलाई - प्लास्टिकमुक्त पर्यावरणाची निर्मिती करण्यासाठी छत्तीसगडच्या भिलाईमधील श्रद्धा साहू या गेल्या दोन वर्षांपासून अविरत मेहनत घेत आहेत. यासाठी त्यांनी क्रॉकरी बँक, म्हणजेच भांड्यांची बँक ही अभिनव संकल्पना राबवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून देशाला प्लास्टिकमुक्त करण्याची घोषणा केली, त्याच्याही कितीतरी आधीपासून श्रद्धा या प्लास्टिकमुक्तीसाठी काम करत आहेत.
श्रद्धा या लोकांना कार्यक्रमांसाठी स्टीलची भांडी देतात, विशेष म्हणजे त्या यासाठी कोणतेही शुल्क आकारत नाहीत.. त्यामुळेच त्यांच्याकडून केवळ भिलाईच नाही, तर आजूबाजूच्या गावांमधील लोकही भांडी घेऊऩ जातात. ही भांडी देताना श्रद्धा केवळ एकच अट लागू करतात, ती म्हणजे, परत देताना ही भांडी स्वच्छ आणि सुस्थितीत परत आणावीत. कार्यक्रमांसाठी प्लास्टिकची भांडी वापरण्याची लोकांची सवय मोडणे, हे श्रद्धा यांचे ध्येय आहे.
विद्यार्थ्यांमध्येही प्लास्टिकबाबत जागृती निर्माण व्हावी यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी श्रद्धा यांना शाळांमध्ये बोलावले जाते. श्रद्धा यांनी उचललेले हे पाऊल, आजच्या पिढीसाठी एक आदर्श आहे. त्यांची ही भांड्यांची बँक कदाचित फार मोठी नसेलही, मात्र त्यातून जाणारा संदेश हा नक्कीच संपूर्ण देशाला प्लास्टिक विरोधात एकत्र आणू शकतो.
Conclusion: