ETV Bharat / bharat

बॉईज लॉकर रुम : मुलीनेच फेक अकाऊंटद्वारे केले होत 'ते' संभाषण, दिल्ली पोलिसांचा धक्कादायक खुलासा..

author img

By

Published : May 10, 2020, 8:59 PM IST

चॅटरुममधील संभाषणाचे जे स्क्रीनशॉट लीक झाले होते, त्यामध्ये एका मुलीवर सामूहिक बलात्कार करण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. यामध्ये सिद्धार्थ नावाचा एक मुलगा दुसऱ्या एका मुलासोबत ही चर्चा करताना दिसून येत होता. मात्र हा मुलगा खरेतर एक मुलगीच असल्याचे समोर आले आहे. याबाबत बोलल्यानंतर समोरच्या मुलाची काय प्रतिक्रिया येते हे पाहण्यासाठी आपण हे फेक अकाऊंट उघडल्याचे तिने सांगितले.

Boislockerroom
बॉईज लॉकर रुम : मुलीनेच फेक अकाऊंटद्वारे केले होत 'ते' संभाषण, दिल्ली पोलिसांचा धक्कादायक खुलासा..

नवी दिल्ली - सोशल मीडियाला हादरवून टाकणाऱ्या बॉईज लॉकर रुम प्रकरणामध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे. या लॉकर रुममध्ये झालेला सामूहिक बलात्काराबाबतचा संवाद ज्या व्यक्तीने केला, तो मुलगा नसून मुलगीच असल्याचे समोर आले आहे. एका मुलीने समोरच्या मुलाची प्रतिक्रिया पाहण्यासाठी फेक अकाऊंट वापरुन ही चर्चा केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दिल्लीतील काही शाळकरी मुलांनी एकत्र येऊन सोशल मीडिया अ‌ॅप इन्स्टाग्रामवर 'बॉईज लॉकर रुम' नावाने एक अकाऊंट तयार केले होते. या ग्रुप चॅटमध्ये ही मुले इन्स्टाग्रामवरील इतर मुलींचे फोटो शेअर करत, आणि त्यांच्यावर असभ्य टिप्पणी करत. कहर म्हणजे, या मुलींवर बलात्कार आणि सामूहिक बलात्कार कसा करता येईल याबाबतही ही मुले चर्चा करत. या चॅटरुममधील संभाषणांचे स्क्रीनशॉट्स लीक झाल्यानंतर हा प्रकार उजेडात आला होता. मात्र आता दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

चॅटरुममधील संभाषणाचे जे स्क्रीनशॉट लीक झाले होते, त्यामध्ये एका मुलीवर सामूहिक बलात्कार करण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. यामध्ये सिद्धार्थ नावाचा एक मुलगा दुसऱ्या एका मुलासोबत ही चर्चा करताना दिसून येत होता. मात्र हा मुलगा खरेतर एक मुलगीच असल्याचे समोर आले आहे. याबाबत बोलल्यानंतर समोरच्या मुलाची काय प्रतिक्रिया येते हे पाहण्यासाठी आपण हे फेक अकाऊंट उघडल्याचे तिने सांगितले. विशेष म्हणजे हे संभाषण इन्स्टाग्रामवरील नसून स्नॅपचॅट या दुसऱ्या एका मेसेंजिंग अ‌ॅपवरचे असल्याचेही समोर आले आहे. बॉईज लॉकर रुममधील स्क्रीनशॉट्ससह हा स्नॅपचॅटवरील स्क्रीनशॉटही व्हायरल झाला होता.

आतापर्यंत २४ सदस्यांचे मोबाईल ताब्यात..

डीसीपीए अन्येष रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण उजेडात आल्यानंतर सायबर सेलच्या पथकाने सोशल मीडियावर नजर ठेवली होती. या प्रकरणाची चौकशी करताना त्यांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते, तसेच इन्स्टाग्रामकडून त्यांनी या ग्रुपमधील बाकी सदस्यांचे आयपी अ‌ॅड्रेसही मागवले होते. शिवाय ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाच्या मोबाईलमधूनही पोलिसांना बरेच धागेदोरे मिळाले. आतापर्यंत पोलिसांनी आणखी २४ जणांशी संपर्क साधत, त्यांचे मोबाईल जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत.

स्वतःवरच बलात्कार करण्याची केली चर्चा..

यामध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणीने सांगितले, की तिने सिद्धार्थ नावाने फेक अकाऊंट काढून, दुसऱ्या एका मुलाशी बलात्काराबाबत चर्चा केली होती. यासाठी तिने स्वतःचे फोटो वापरले होते. स्वतःचे फोटो समोरच्या मुलाला पाठवून, या मुलीवर आपण बलात्कार करू असे ती समोरच्या मुलाला म्हणत होती. त्यावर त्या मुलाची काय प्रतिक्रिया येते हे पाहण्यासाठी तिने हे केले असल्याची कबूली तिने दिली आहे.

समोरच्या मुलाने दिला होता नकार..

या मेसेजनंतर, समोरच्या मुलाने सिद्धार्थला त्याच्या मागणीसाठी नकार दिला होता. तसेच तूही असे काही करू नको, असे त्याला सांगितले होते. त्यानंतर त्याने सिद्धार्थने पाठवलेल्या मेसेजेसचा स्क्रीनशॉट काढून आपल्या मित्राला पाठवला होता. हाच स्क्रीनशॉट सध्या बॉईज लॉकर रुमच्या स्क्रीनशॉट्ससह व्हायरल होतो आहे.

हेही वाचा : 'बॉईज लॉकर रूम' प्रकरण : हरियाणातील एका शाळकरी मुलाने केली आत्महत्या..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.