वाराणसी - भारतामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांचा आकडा ६० जवळ आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विषाणूंचा संसर्ग होऊ नये, यासाठी वाराणसीमधील प्रल्हादेश्वर मंदिरातील शिवलिंगालाच चक्क मास्क घातला आहे.
प्रल्हादेश्वर मंदिरातील शिवलिंगाला मास्क लावलण्यात आले आहे. 'कोरोना विषाणू देशभर पसरत आहे. आम्ही हे मास्क लोकांना जागृत करण्यासाठी शिवलिंगाला घातले आहे', असे मंदिरातील पुजारीने सांगितले. तसेच कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी पुजारीने मंदिरात येणाऱ्या भाविकांनी शिवलिंगाला स्पर्श करण्यास मनाई केली आहे. तर मंदिरातील पुजारी आणि भक्तींनी मास्क घालून पूजा केली आहे. दरम्यान शिवलिंगाला मास्क घातलेले छायाचित्र सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
-
Varanasi:The 'Shivling' at Prahladeshwar temple have been covered with a mask&posters have been put up in temple appealing devotees to not touch the idols.A devotee says,"we are urging ppl not to touch the idols.If idols are touched,#coronavirus will spread & infect more people." pic.twitter.com/c0ZTGjVtFM
— ANI UP (@ANINewsUP) March 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Varanasi:The 'Shivling' at Prahladeshwar temple have been covered with a mask&posters have been put up in temple appealing devotees to not touch the idols.A devotee says,"we are urging ppl not to touch the idols.If idols are touched,#coronavirus will spread & infect more people." pic.twitter.com/c0ZTGjVtFM
— ANI UP (@ANINewsUP) March 10, 2020Varanasi:The 'Shivling' at Prahladeshwar temple have been covered with a mask&posters have been put up in temple appealing devotees to not touch the idols.A devotee says,"we are urging ppl not to touch the idols.If idols are touched,#coronavirus will spread & infect more people." pic.twitter.com/c0ZTGjVtFM
— ANI UP (@ANINewsUP) March 10, 2020
चीनमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून कोरानाची दहशत आता जगभर पसरली आहे. दक्षिण आशियायी देशांमध्येही कोरोना मोठ्या प्रमाणात पसरला आहे. भारतात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असून रुग्णाची संख्या 60 वर पोहचली आहे. तर अनेकांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. विविध राज्यांनी संभाव्य धोका ओळखून आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. तसेच कोरोना विषाणूबाबत नागरिकांमध्ये जनजागृती वाढवण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याबरोबरच आरोग्याची काळजी घेण्याबाबत नियमावली जारी केली आहे.
हेही वाचा - दुबईहुन परतलेल्या कोरोना संशयिताचा कर्नाटकात मृत्यू