ETV Bharat / bharat

डी. के. शिवकुमार यांचा भाजपवर हल्लाबोल, 'मला त्रास देण्यासाठी भाजप सर्व करतयं'

कर्नाटकातील काँग्रेस नेते डी. के.शिवकुमार यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. यासंबधी शिवकुमार चौकशीसाठी दिल्लीला रवाना होणार आहेत.

डी.के. शिवकुमार
author img

By

Published : Aug 30, 2019, 11:34 AM IST

नवी दिल्ली - कर्नाटकातील काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. यासंबधी शिवकुमार चौकशीसाठी दिल्लीला रवाना होणार आहेत. 'मी कोणतेही बेकायदेशीर काम केले नसून मला त्रास देण्यासाठी भाजप हे सर्व करत आहे. त्यांना याचा आनंद घेऊ द्या', असे त्यांनी म्हटले आहे.

  • DK Shivakumar, Congress on being summoned by ED: There’s no illegal activities that I've done. BJP leaders have said it on record, they're going to harass me. Let them enjoy giving me trouble. But I'll participate&cooperate. I am busy till this afternoon, then I will go to Delhi. https://t.co/4Ad4atOpzA pic.twitter.com/mi8h2pJTHc

    — ANI (@ANI) August 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हे ही वाचा - INX प्रकरण : पी. चिदंबरम यांची सीबीआय कोठडी आज संपणार; न्यायालयात हजर करण्याची शक्यता

मी न्यायालयाला विनंती केली होती, की हे एक साधे आयकर प्रकरण असून मी यापुर्वीच आयकर दाखल केले आहे. यामध्ये कुठलाही आर्थिक गैरव्यवहार नाही. मात्र, काल (गुरुवारी) त्यांनी मला समन्स पाठवले. मी न्यायालयाचा आदर करतो. आज दुपारी मी दिल्लीला रवाना होईल आणि चौकशीमध्ये पुर्ण सहकार्य करेल', असे शिवकुमार म्हणाले.

हे ही वाचा - राष्ट्रीय तपास संस्थेचे कोईम्बतूरमध्ये 5 ठिकाणी छापे, लॅपटॉप-मोबाइल फोन जप्त

ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असून काँग्रेसचा एक निष्ठावंत सैनिक आणि एक जबाबदार राजकारणी म्हणून, पक्षाने मला जे करण्यास सांगितले, ते मी केले, त्यासाठी मला लक्ष्य केले जात आहे. मला कायदेशीर यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे. मला कायदेशीर या गोष्टीचा सामना करावा लागेल, असे त्यांनी दुसर्‍या ट्विटमध्ये म्हटले आहे.

2018 नोव्हेंबर मध्ये शिवकुमार यांना ईडीने नोटीस बजावले होते. याप्रकरणी त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गुरुवारी त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली असून आता त्यांना ईडीपुढे चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.

हे ही वाचा - न्यायपालिकेतील भ्रष्टाचार उघड केल्यामुळे न्यायाधीशांवरच कारवाई!

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीदेखील ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.