ETV Bharat / bharat

शीना बोरा हत्याकांड : मुंबई उच्च न्यायालयाकडून पीटर मुखर्जीला जामीन मंजूर - पीटर मुर्खजीला जामीन मंजूर

शीना बोरा हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक आरोपी पीटर मुखर्जीचा मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

शीना बोरा हत्याकांड
शीना बोरा हत्याकांड
author img

By

Published : Feb 6, 2020, 4:49 PM IST

Updated : Feb 6, 2020, 7:24 PM IST

मुंबई - शीना बोरा हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक आरोपी पीटर मुखर्जीचा मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 2 लाख रुपयांच्या जातमुचलक्यांवर पीटरचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. पीटरची तब्येत ठीक नसल्याचे वकिलांकडून सांगण्यात आले.

  • Sheena Bora case: Bombay High Court has stayed the order for 6 weeks on CBI's request, so that it can file an appeal in the Supreme Court. https://t.co/odCk2gDPZG

    — ANI (@ANI) February 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शीना बोरा हत्या कांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी हे दोघेही मुंबईतील कारागृहात गेल्या 4 वर्षांपासून आहेत. मात्र, आता पीटर मुखर्जी यास उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. शीना बोराच्या हत्येवेळी पीटर भारतात नव्हता, असा युक्तीवाद मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. तसेच पीटरचे आजारपण तुरुंगात बळावण्याची शक्यता असल्याचे वकिलांकडून सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर पीटर मुखर्जी यास जामीन मंजूर करण्यात आला आहे.

हेही वाचा - इंटरनेट वापराबाबत काश्मीरचे घटनात्मक अधिकार!

दरम्यान, सीबीआयने पीटरला जामीन देण्याचा सातत्याने विरोध केला आहे. पीटरला जामीन दिल्यानंतर उच्च न्यायालयाने आपला हा आदेश सहा आठवड्यांसाठी प्रलंबित ठेवला आहे. जेणेकरून सीबीआय या जामिनाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकेल. त्यामुळे जामीन जरी मिळाला असला तरी पीटर मुखर्जीला येत्या 6 आठवड्यांपर्यंत तुरुंगात राहावे लागणार आहे.

काय आहे प्रकरण?

पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांनी साथीदारांसह एप्रिल २०१२ मध्ये मुलगी शीना बोराची (वय २४) अत्यंत क्रुरपणे हत्या केली होती. शीनाचा मृतदेहाची रायगड येथील जंगलात विल्हेवाट लावण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी तपास करत इंद्राणीचा पहिला नवरा संजीव खन्ना, चालक रायला यांनाही अटक केली होती. शीनाच्या हत्येवेळी पीटर मुखर्जी हा परदेशात होता. मात्र, तेथूनही तो इंद्राणीच्या संपर्कात होता. पीटर आणि आणि इंद्राणी यांच्या मध्ये जवळपास २० ते २५ संभाषण झाले होते. दरम्यान पीटर मुखर्जी व इंद्राणी मुखर्जी या दोघात घटस्फोट झाला असून या दोघांनी सहमतीने घटस्फोट घेत संपत्ती वाटून घेतली आहे.

हेही वाचा - नो टू सिंगल यूज प्लास्टिक: कोलकात्यातील बांगुर एवेन्यू झालंय प्लास्टिक मुक्त

Intro:संपूर्ण देशात खळबळ माजविणाऱ्या बहुचर्चित शिना बोरा हत्याप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी मयत शिना बोरा हिचे सावत्र वडील पीटर
मुखर्जीला यास जामीन मंजूर केला आहे.सीबीआय कडुन 2015 साली शिनाबोरा हत्या कांडात अटक झाल्यानंतर पीटर मुखर्जीं व शीना बोरा हत्या कांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हे दोघेही मुंबईतील कारागृहात गेली चार वर्षे आहेत. मात्र आता पीटर मुखर्जी यास उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.पीटर मुखर्जी याला असलेले आजार आणि शीना बोरा हिचा जेव्हा खून झाला होता तेव्हा पीटर भारतात नव्हता असा युक्तिवाद मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला होता.या पार्श्वभूमीवर पीटर मुखर्जी यास जामीन मंजूर करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण

शीना बोरा हत्या कांडात तपास यंत्रणांनी सुरवातीला इंद्राणी मुखर्जीं , संजीव खन्ना व तिचा वाहणचालक शाम राय या तिघांना अटक केली होती.मात्र पुढील तपासात पिटर मुखर्जी ह्याचा सुद्धा या हत्या प्रकरणात हात असल्याचे समोर आल्यानंतर पीटर मुखर्जी यास अटक करण्यात आली होती. शीना बोरा हिची हत्या होण्याच्या आगोदर पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या मधील जवळपास २० ते २५ मिनिटांचा कॉल रेकोर्ड पुरावा म्हणून समोर आला होता. ज्या दिवशी शिना ची हत्या झाली त्या वेळी परदेशात असतानाही पीटर मुखर्जी हे इंद्राणीच्या संपर्कात होता , मुंबई पोलिस आणि सीबीआय ला दिलेल्या वेगवेगळ्या पिटर मुखर्जीच्या जबानीत विसंगती असल्याचे तपासादरम्यान आढळून आले होते. दरम्यान पीटर मुखर्जी व इंद्राणी मुखर्जी या दोघात घटस्फोट झाला असून या दोघांनी सहमतीने घटस्फोट घेत संपत्ती वाटून घेतली आहे.

, Body:.Conclusion:
Last Updated : Feb 6, 2020, 7:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.