ETV Bharat / bharat

अर्थसंकल्पानंतर सेन्सेक्स पडला पण घाबरण्याची गरज नाही; तज्ञांचे मत

अर्थसंकल्प जाहीर होण्याच्यापूर्वी सेन्सेक्स ४० हजारांवर गेला होता. तर, निफ्टी ११ हजाराने वर होता. परंतु, बजेट जाहीर झाल्यानंतर मार्केट पडलेले चित्र पाहायला मिळत आहे.

मुंबई शेअर मार्केट
author img

By

Published : Jul 5, 2019, 4:13 PM IST

मुंबई - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आज अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक क्षेत्रासाठी तरतूद करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु, अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी तेजीत असणारा सेन्सेक्स अर्थसंकल्प मांडून झाल्यानंतर कोसळला आहे. तज्ञांचे मते, अर्थसंकल्प हा भविष्याचा विचार करुन मांडण्यात आला असल्यामुळे शेअर बाजारात पुन्हा उसळी येणार आहे.

अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात घसरण

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी तसेच लघु-उद्योग धारकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी अनेक सुविधांची तरतूद करण्यात आली आहे. परंतु, शेअर मार्केटच्या मार्केट व्हॅल्यूमध्ये घसरण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वी सेन्सेक्स ४० हजारांवर गेला होता. तर, निफ्टी ११ हजाराने वर होता. परंतु, बजेट जाहीर झाल्यानंतर मार्केट पडलेले चित्र पाहायला मिळत आहे. परंतु, अर्थसंकल्पामध्ये सरकारने कर्ज घेणाऱ्या गटांसाठी विचार केलेला आहे. त्यामुळे सध्या पडलेल्या शेअर बाजारात वाढ होईल, असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

शेअर मार्केटचे गुंतवणूकदारांवर १० टक्के इन्वेस्टमेंट चार्ज लावण्यात आलेला आहे. तो काही प्रमाणात कमी झाला असता, तर बरे झाले असते, असे इच्छा गुंतवणूकदारांनी व्यक्त केली. कमी दर्जाच्या कंपन्या आणि मध्यमवर्गीय दर्जाच्या कंपन्यांचे शेअर्स पडलेले आहेत. परंतु, सरकारने लघु उद्योग आणि मध्यमवर्गीय व्यवसायासाठी अर्थसंकल्पामध्ये काही चांगल्या तरतुदी केल्या आहेत. हे पाहता शेअर्सची व्हॅल्यू आगामी काळात वाढेल असे तज्ञ सांगत आहेत. त्यामुळे एकंदरीत सादर झालेला अर्थसंकल्पा पुढील काळात फायदाच होणार आहे.

बजेट सादर झालं शेअर मार्केट मध्ये सेन्सेक्स पडला आहे, परंतु आगामी काळात हे बजेट लॉन्ग टाइमसाठी असल्यामुळे यांची व्हॅल्यू वाढेल तज्ञांचं मत

आज देशाचा आर्थिक संकल्प जाहीर झालेला आहे आणि यामध्ये प्राप्तिकर शेतकऱ्यांसाठी तसेच लघु उद्योग धारकांसाठी व गुंतवणूकदारांसाठी अनेक सुविधा आपणास पहावयास मिळत आहे .परंतु शेअर मार्केट मध्ये कुठेतरी मार्केट व्हॅल्यू पडल्याचे दिसत आहे .बजेट जाहीर होण्याच्या आधी सेन्सेक्स 40 हजारांवर गेला होता व निफ्टी 11000 ने वर होता. परंतु बजेट जाहीर झाल्यानंतर मार्केट पडलेला आहे असं चित्र आहे. त्यामुळे कुठेतरी गुंतवणूकदार आपण घेतलेले शेअर हे तोट्यात गेल्याचं मनात आहेत .परंतु बजेटमध्ये सरकारने लोन गटांसाठी विचार केलेला आहे .त्यामुळे या व्हॅल्यू पडलेली आहे त्याची पुढे आगामी काळात वाढ होईल असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

देशाचा आर्थिक संकल्प आज जाहीर झालेला आहे त्यामध्ये शेअर मार्केटचे काही जे गुंतवणूकदार आहेत त्यांच्यावर 10% इन्वेस्टमेंट चार्ज लावण्यात आलेला आहे .तो काही प्रमाणात कमी झाला असता, तर बरं झालं असतं असं गुंतवणूकदार इच्छा व्यक्त करत आहेत. कमी दर्जाच्या कंपन्या व मध्यमवर्गीय कंपनी दर्जाच्या कंपन्या यांचे शेअर्स पडलेले आहेत. परंतु सरकारने लघु उद्योग व मध्यमवर्गीय व्यवसायासाठी बजेट मध्ये काही चांगल्या तरतुदी केल्या आहेत हे पाहता या शेअर्सची व्हॅल्यू आगामी काळात वाढेल असे तज्ञ सांगत आहेत .त्यामुळे हे एकंदरीत सादर झालेले बजेट हे शेअर मार्केट वरील आता पडलेले सेंसेक्स, निफ्टी पाहता घाबरण्याचे कारण नाही .याचा पुढे फायदाच होईल असे हे बजेट पाहून तज्ञ सांगत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.