ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदी विरोधात आघाडीच्या शालिनी यादव रिंगणात; मोदींसाठी 'हे' आव्हान - Varanasi

शालिनी यादव व्यतिरिक्त चंदौली लोकसभा मतदार संघातून संयज चौव्हान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आघाडीमध्ये जागा वाटपाच्या वेळी वाराणसी समाजवादी पक्षाच्या पारड्यत पडली होती.

शालिनी यादव, नरेंद्र मोदी
author img

By

Published : Apr 23, 2019, 12:04 AM IST

Updated : Apr 23, 2019, 11:13 AM IST

लखनौ - समाजवदी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रीय लोक दलाच्या आघाडीने पंतप्रधान मोदी विरोधात शेवटी आपला उमेदवार जाहीर केला आहे. शालिनी यादव या वाराणसीतून मोदी विरोधात निवडणूक लढतील. शालिनी यादव या काँग्रेसचे माजी खासदार आणि राज्यसभेचे माजी उपसभापती श्यामलाल यादव यांच्या कन्या आहेत. वाराणसीमध्ये ७व्या टप्प्यात १९ मे'ला मतदान होणार आहे.

शालिनी यादव व्यतिरिक्त चंदौली लोकसभा मतदार संघातून संयज चौव्हान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आघाडीमध्ये जागा वाटपाच्या वेळी वाराणसी समाजवादी पक्षाच्या पारड्यत पडली होती. त्यामुळे या जागी मोदींविरोधात शालिनी यादव यांना लढावे लागेल.

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. येथून पंतप्रधान मोदीसारखेच माजी पंतप्रधान चंद्रशेखर, काँग्रेस नेते कमलापती त्रिपाठी आणि दिवंगत पंतप्रधान लालबादुर शास्त्री यांचे पुत्र अनिल शास्त्री यांनीही निवडणूक लढवली आहे. २००९च्या निवडणुकांमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनीही निवडणूक जिंकली होती.

मागच्या लोकसभा निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांनी मोदींविरोधात निवडणूक लढवली होती. त्यामध्ये २ लाख मत घेऊन ते दुसऱ्या स्थानावर होते. मात्र, २००९च्या आकड्यांवर नजर टाकली तर, एसपी आणि बसप यांना एकूण मुरली मनोहर जोशी यांच्यापेक्षा जास्त मतदान मिळाले होते. मात्र, दोघांनी वेगवेगळी निवडणूक लढवल्यामुळे मुरली मनोहर जोशी निवडून आले होते. यावेळी मात्र हे दोन्ही पक्ष एकत्र असल्यामुळे मोदींसमोर आव्हान उभे राहू शकते. तर, प्रियांका गांधीही या जागेवरुन निवडणूक लढवणार, अशी चर्चा आहे.

Intro:Body:

National News 7

Conclusion:
Last Updated : Apr 23, 2019, 11:13 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.