ETV Bharat / bharat

पीडितेने घेतले चिन्मयानंदवरील लैंगिक शोषणाचे आरोप मागे - शहाजहापूर लैंगिक शोषण केस

शहाजहापूर येथे कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीने माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. कथित पीडितेने अलाहाबाद न्यायालयात हजर राहून आपण केलेले आरोप नाकारले आहेत.

चिन्मयानंद
चिन्मयानंद
author img

By

Published : Oct 14, 2020, 11:41 AM IST

लखनऊ - शहाजहापूर येथील कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने भाजपाचे माजी खासदार चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. याच मुलीने आता सर्व आरोप मागे घेतले आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अलाहाबाद न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. कथित पीडितेने अलाहाबाद न्यायालयात हजर राहून आपण केलेले आरोप नाकारले आहेत.

पीडितेच्या या निर्णयामुळे खटला पुढे चालू शकला नाही. त्यामुळे न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी पीडितेवर गुन्हा दाखल करण्याचे सांगण्यात आले. न्यायाधीश पीके राय यांनी याबाबत निर्देश दिले आहेत. १५ ऑक्टोबरला पुन्हा यावर सुनावणी घेतली जाणार आहे.

शहाजहापूर येथे कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीने माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. हा आरोप झाल्यानंतर उत्तर प्रदेशात मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला होता. चिन्मयानंद निर्दोष असल्याचे सांगत त्यांचे पाठीराखे रस्त्यावर उतरले होते. मात्र, पीडित विद्यार्थिनीनेही माघार न घेता या संदर्भातील अनेक व्हिडिओ जाहीर केले होते. त्यानंतर चिन्मयानंद यांना अटक अटक करण्यात आली होती. त्यानंतर मात्र, चिन्मयानंद यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर केला गेला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.