ETV Bharat / bharat

COVID-19 : राजस्थानातील चुरुमध्ये एकाचवेळी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह; शहरात संचारबंदी लागू - churu

हजरत निजामुद्दीन मरकझ मध्ये सहभागी होऊन 17 जण चुरु जिल्ह्यात परतले होते. यापैकी 7 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 17 जणांना प्रशासनाने 31 मार्च रोजी क्वारंटाईन केले होते.

seven-people-corona-report-positve-in-churu-distirct
Coronavirus: राजस्थानातील चुरुमध्ये एकाचवेळी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह; शहरात संचारबंदी लागू
author img

By

Published : Apr 2, 2020, 11:29 AM IST

Updated : Apr 2, 2020, 3:03 PM IST

जयपूर- दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन मरकझ मध्ये सहभागी होऊन 17 जण चुरु जिल्ह्यात परतले होते. यापैकी 7 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकाच वेळी 7 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र खळबळ माजली. यानंतर जिल्हा प्रशासनाने मध्यरात्री चुरु आणि सरदार शहरात संचारबंदी लागू केली आहे.

Coronavirus: राजस्थानातील चुरुमध्ये एकाचवेळी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह; शहरात संचारबंदी लागू

राजस्थानातील चुरु जिल्ह्यात 7 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. चुरु जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यानंतर सरदार व चुरु शहरात संचारबदी लागू केली आहे. आरोग्य सेवा सोडून बाकी सर्व सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

चुरु शहरातील 3 जणांचे तर सरदार शहरातील 4 जणांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. हजरत निजामुद्दीन मर्कज मध्ये सहभागी झालेल्या 17 जणांना 31 मार्च रोजी क्वारंटाईन करण्यात आले होते. पॉझिटिव्ह अहवाल आलेले 7 जण राजलदेसर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सरदार शहरमध्ये क्वारंटाईन होते. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांना बिकानेरला हलवण्यात आले आहे.

आरोग्य सेवा वगळता अत्यावश्यक सेवांमध्ये येणारे दूध, भाजीपाला हे सुद्धा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. यामुळे लोकांना घराबाहेर पडण्यास पूर्णपणे मज्जाव करण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

Last Updated : Apr 2, 2020, 3:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.