ETV Bharat / bharat

सावरला! मोठ्या पडझडीनंतर निफ्टीसह वधारला मुंबई शेअर बाजार

author img

By

Published : Mar 13, 2020, 9:51 AM IST

Updated : Mar 13, 2020, 1:17 PM IST

बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे कोट्यवधी रुपयांचे भांडवली मूल्य गमाविले आहे. या कंपन्यांचे सकाळी साडेदहा वाजता सुमारे १२,७८,१७२.७५ कोटी रुपयांचे भांडवली मूल्य होते. तर गुरुवारी कंपन्यांचे भांडवली मूल्य हे १,२५,७०,६५२.६३ कोटी रुपये होते. .

शेअर बाजाराची घसरण थांबेना
शेअर बाजाराची घसरण थांबेना

मुंबई - शेअर बाजारात सकाळच्या सत्रात मोठी पडझड झाली होती. त्यानंतर मुंबई शेअर बाजार आणि निफ्टीचा निर्देशांक वधारला आहे.

मुंबई शेअर बाजार ३,९०० अंशांनी सावरला आहे. दुपारी १२ वाजून ८ मिनिटाला मुंबई शेअर बाजार २८९.२१ अंशांनी वधारून ३३,०६७.३५ वर पोहोचला. तर मागील सत्रात मुंबई शेअर बाजार बंद होताना ३२,७७८.१४ वर स्थिरावला होता. तर सकाळच्या सत्रात शेअर बाजार घसरून २९,३८८.९७ वर पोहोचला होता. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी ५० शेअर निर्देशांक ७७.५० अंशांनी वधारून ९,६६७.६५ वर स्थिरावला. बाजार विश्लेषकांच्या मते, गुंतवणूकदार शेअर बाजाराची कमी खरेदी करत आहेत. शेअर बाजारात लोअर सर्किट लागू केल्यानंतर सकाळी १० वाजून २० मिनिटाला शेअर बाजार पूर्ववत सुरू करण्यात आला.

शेअर बाजारात खुला होताना केवळ १५ मिनिटात गुंतणूकदारांनी सुमारे १२ लाख कोटी रुपयांची संपत्ती गमाविली. कोरोनाच्या भीतीने निफ्टीच्या निर्देशांकात १० टक्क्यांची घसरण झाल्यानंतर शेअर बाजार गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला आहे.

बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे कोट्यवधी रुपयांचे भांडवली मूल्य गमाविले आहे. या कंपन्यांचे सकाळी साडेदहा वाजता सुमारे १२,७८,१७२.७५ कोटी रुपयांचे भांडवली मूल्य होते. तर गुरुवारी कंपन्यांचे भांडवली मूल्य हे १,२५,७०,६५२.६३ कोटी रुपये होते.

१३ मार्च १२: ११

लोअर सर्किटमध्ये जेट एअरवेजमध्ये मोठी घसरण

जेट एअरवेजच्या शेअरमध्ये ४.७४ टक्क्यांछी घसरण झाली आहे.

जेट एअरवेजची लोअर सर्किटमध्ये मुंबई शेअर बाजारात प्रति शेअर १८.०५ रुपये किंमत होती. तर निफ्टीमध्ये प्रति शेअर १७.७० रुपये किंमत होती.

१३ मार्च १२:१०

येस बँकेचे शेअर १० टक्क्यांनी वधारले

स्टेट बँक ऑफ इंडियाने येस बँकेचे शेअर ७,२५० कोटी रुपयांना विकत घेण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे येस बँकेचे शेअर १० टक्क्यांनी वधारले आहेत.

येस बँकेचे शेअर मुंबई शेअर बाजारात ९.९८ टक्क्यांनी वधारून प्रति शेअर २७.५५ रुपये झाले आहेत. तर निफ्टीत १०.५७ टक्क्यांनी वधारून प्रति शेअर २७.७० रुपये झाले आहेत.

कोरोनाच्या भीतीने जागतिक शेअर बाजारातसह देशातील शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण

१३ मार्च १२:०८

कोरोनामुळे जगभरातील ५ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या धास्तीने जगभरातील शेअर बाजारात घसरण झाली आहे. त्याचा फटका देशातील शेअर बाजाराला बसला आहे. विविध उद्योगांना आर्थिक फटका बसला आहे. विविध खेळ स्पर्धा तर दिल्लीसारख्या शहरांमधील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. जपानच्या शेअर बाजारात १० टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. तर वॉल स्ट्रीटमध्ये १९८७ नंतर सर्वात मोठी घसरण झाली आहे.

हेही वाचा-वाहन उद्योगावरील मंदीचे सावट कायम; फेब्रुवारीत वाहन विक्रीत १९ टक्के घसरण

  • व्होडाफोन आडिया, भारती एअरटेलसह दूरसंचार कंपन्यांच्या शेअरमध्ये सुधारणा
  • मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजार पुन्हा तेजीत, सेन्सेक्समध्ये ४६९.३१ तर निफ्टीमध्ये ६०.७५ अशांची सुधारणा
  • सन फार्मा, एसबीआय, कोटक महिंद्रा, येस बँक, एचडीएफसी, व्होडाफोन आडिया, भारती एअरटेल यांचे शेअर पुन्हा सुधारल्याने दिलासादायक चित्र
  • एशियन पेंट, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, ओएनजीसी, इण्डसीन बँक, युपीएल, विप्रो, एमआरपीएल यांचे शेअर घसरले.
    निफ्टीही पुन्हा ८०० अंशांनी चढला.
  • सेन्सेक्समध्ये २५०० अंशांची सुधारणा झाल्याने दिलासा
  • घसरण सुरूच सेन्सेक्सची ३३१९ अशांनी आपटी
  • निफ्टीत ९६६.१ अकांची घसरण होऊन ८६२४.०४ अंकांवर स्थिर

हेही वाचा-गुगलच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण; सर्वांना 'वर्क फ्रॉम होम'च्या सूचना

मुंबई - शेअर बाजाराने आज पुन्हा मोठी घसरण नोंदवली. मुंबई शेअर बाजार निर्देशांक ३०९० अंशांनी तर निफ्टी ९६६ अंशांनी कोसळला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला जागतिक साथ म्हणून घोषित केल्यानंतर शेअर बाजारावर त्याचे परिणाम दिसू लागले आहेत.

सेन्सेक्समधील प्रमुख कोटक महिंद्रा बँक आणि टाटा कन्सलटन्सी सेवा यांचे शेअर १४ टक्क्यांनी घसरले. तर रिलायन्सचे शेअर १० आणि एचडीएफसीचे ५ टक्क्यांनी शेअर घसरले.

शुक्रवारी सकाळी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सची ३ हजार ९०.६२ अंकांची घसरण होऊन तो २९६८७.५२ अंकांवर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही ९६६.१ अकांची घसरण होऊन तो ८६२४.०४ अंकांवर पोहोचला.

कोरोना विषाणूचा जगभरात होत असलेला फैलाव या पडझडीला कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. कोरोना विषाणूमुळे बाजारपेठा ठप्प होण्याची शक्यता असल्याने अर्थव्यवस्थेवर अत्यंत विपरित परिणाम होत आहेत. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने घसरण सुरू आहे.

Last Updated : Mar 13, 2020, 1:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.