ETV Bharat / bharat

जाणून घ्या... अमेरिकेच्या अध्यक्षांची सुरक्षा व्यवस्था कशी असते? - नमस्ते ट्रम्प कार्यक्रम

अमेरिकेच्या अध्यक्षांना जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती मानले जाते. अशा महत्त्वपूर्ण व्यक्तीला सुरक्षा पुरवणे हे मोठे जबाबदारीचे काम आहे. अमेरिकेच्या गुप्तचर खात्यातील 'प्रेसिडेन्शिअल प्रोटेक्टीव्ह डिव्हिजन' या विभागाकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

security arrangement of donald trump
ड्रम्प यांची सुरक्षा व्यवस्था
author img

By

Published : Feb 22, 2020, 6:10 PM IST

Updated : Feb 22, 2020, 8:03 PM IST

हैदराबाद - अमेरिकेच्या गुप्तचर विभागाची स्थापना १८६५ साली झाली आहे. हा विभाग जगातील सर्वात जुन्या गुप्तचर यंत्रणांपैकी एक आहे. १०० वर्षांपेक्षाही जास्त वर्षांपासून ही सिक्रेट सर्व्हिस अध्यक्षांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहे.

जाणून घ्या... अमेरिकेच्या अध्यक्षांची सुरक्षा व्यवस्था कशी असते?

या विभागांध्ये ३ हजार २०० विशेष गुप्तचर आहेत. तर १ हजार ३०० युनिफॉर्म घातलेले अधिकारी आहेत. त्यांच्याकडे राष्ट्राध्यक्ष, त्यांचे निवासस्थान व्हाईट हाऊस, ट्रेजरी इमारत आणि इतर देशांच्या दूतावासाच्या कार्यालयाची सुरक्षा व्यवस्था असते.

अमेरिकेच्या अध्यक्षांना जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती मानले जाते. अशा महत्त्वपूर्ण व्यक्तीला सुरक्षा पुरवणे हे मोठे जबाबदारीचे काम आहे. अमेरिकेच्या गुप्तचर खात्यातील 'प्रेसिडेन्शिअल प्रोटेक्टीव्ह डिव्हिजन' या विभागाकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेचे काम त्यांच्याकडे असते.

गुप्तचर विभागाचे एजंट अध्यक्षांच्या दौऱ्याआधीच किमान महिनाभर सर्व परिसराची टेहाळणी करतात. हवाई क्षेत्रही 'नो फ्लाय झोन' करण्यात येते. याबरोबरच रस्ते, रुग्णालये आणि इतर सुरक्षित स्थाने आणीबाणीच्या परिस्थितीसाठी हेरून ठेवली जातात. संपूर्ण दौऱ्यात सुरक्षा अधिकारी ट्रम्प यांच्या बरोबर असतात.

कार्यक्रम स्थळाच्या जवळपास १० मैल अंतरापर्यंत 'अंतर्गत सुरक्षा कडे' असेत. या प्रतिबंधित क्षेत्रात १८ हजार फूट उंचीच्या खाली कोणतीही विमान उडवण्यास परवानगी नसते. तसेच विमानतळावरही उतरू शकत नाही. मात्र, ३० मैल लांबीच्या बाह्य सुरक्षा कड्यात विमानांना उतरण्यास परवानगी आहे.

राष्ट्राध्यक्षांबरोबर सुरक्षा रक्षकांचा ताफा कायम असतो. या ताफ्यात २० वाहनांचा समावेश असतो. ही वाहने सुरक्षा व्यवस्थेवर प्रत्येक क्षण नजर ठेवून असतात. अध्यक्षांचा वेळ कसा वाचेल? हे पाहण्याबरोबरच महामार्गांवरील सर्व ठिकाणांवर आणि घटनांवर लक्ष ठेवून असतात. सुरक्षा रक्षकांच्या ताफ्याबरोबरच स्थानिक पोलीस अधिकारी अध्यक्षांना सुरक्षा पुरवत असतात. स्थानिक प्रशासनाबरोबरच राष्ट्राध्यक्षांच्या वाहनामागे गुप्तचर विभागाची वाहने असतात...

गुप्ततर विभागाची काऊंटर टीम शस्त्रसज्ज असून कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तयार असते. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांबरोबरच हल्ला झाल्यावर आग विझवण्यासाठीची अत्याधुनिक यंत्रणा त्यांच्यासोबत असते.

Last Updated : Feb 22, 2020, 8:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.