ETV Bharat / bharat

कोरोना व्हायरस : ३२३ भारतीयांसह मालदिवच्या 7 नागरिकांना घेऊन विमान दिल्लीत दाखल

भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी चीनमध्ये गेलेले एअर इंडियाचे दुसरे विशेष विमान आज सकाळी दिल्लीमध्ये दाखल झाले आहे.

author img

By

Published : Feb 2, 2020, 10:40 AM IST

कोरोना व्हायरस
कोरोना व्हायरस

नवी दिल्ली - चीनमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. तिथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी चीनमध्ये गेलेले एअर इंडियाचे दुसरे विशेष विमान आज सकाळी दिल्लीमध्ये दाखल झाले आहे. चीनहून ३२३ भारतीयांसह मालदीवच्या 7 नागरिकांना घेऊन विमान सव्वा नऊ वाजता दिल्लीत पोहचले आहे.

यापूर्वी एअर इंडियाच्या पहिल्या विशेष विमानाने चीनवरून ३२४ भारतीयांना आणले होते. यातील काही नागरिकांना भारत-तिबेट सीमा पोलिसांच्या छावला कॅम्पमध्ये तर इतरांना हरियाणाच्या मानेसरमधील सैन्य शिबिरामध्ये दाखल करण्यात आले आहे. या भारतीयांमध्ये ३ अल्पवयीन आणि २११ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पुढील १४ दिवस त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा - विश्व हिंदू महासभेच्या उत्तर प्रदेश अध्यक्षांची गोळी घालून हत्या

चीनमध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला असून तब्बल दहा हजारांच्या आसपास लोकांना या विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती समोर येत आहे. परिस्थितीचे गांभीर्य पाहता, जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. जगभरातील देश आपापल्या नागरिकांना चीनमधून परत मायदेशी आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा - 'गोमूत्र आणि शेणाद्वारे केला जाऊ शकतो कोरोना विषाणूवर उपचार '

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.