ETV Bharat / bharat

बिहार निवडणूक: एनडीएचं जागा वाटपाचे गणित १५ सप्टेंबरपर्यंत सुटणार

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा लवकरच पाटण्याचा दौरा करणार आहेत. यावेळी ते मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्याशी जागा वाटपासंबंधी चर्चा करणार असल्याची माहिती पक्षातील सुत्रांनी सांगितली.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Sep 9, 2020, 8:30 PM IST

पाटणा - बिहार राज्याच्या विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात प्रस्तावित आहे. निवडणुका जवळ येऊ लागल्याने राजकीय पक्ष आतापासूनच तयारीला लागले आहे. भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला १५ सप्टेंबरपर्यंत निश्चित्त होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा लवकरच पाटण्याचा दौरा करणार असून यावेळी ते मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्याशी जागा वाटपासंबंधी चर्चा करणार असल्याची माहिती पक्षातील सुत्रांनी सांगितली. जनता दल युनायटेड आणि भाजप हे आघाडीत दोन मोठे पक्ष प्रत्येकी सुमारे १०० ते ११० जागांवर निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. तर आघाडीतील लोक जनशक्ती पार्टी (एलपेजी), हिंदुस्तानी अवाम मोर्चा यांसारखे पक्ष इतर जागांवर लढणार आहेत.

एलजेपी पक्षाने राज्यातील एकूण विधानसभेच्या २४३ जागांपैकी १४३ जागांवर निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आघाडीतील जागा वाटपाचा निर्णयाला दिरंगाई झाली, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

२०१५ साली जनता दल युनायटेड (JD-U) आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) भाजप विरोधात महागठबंधन आघाडी तयार करून लढले. मात्र, आरजेडी बरोबर मतभेद झाल्यानंतर जेडीयू पक्ष महागठबंधन मधून फुटून बाहेर पडला. त्यानंतर महागठबंधन आघाडीत आरजेडीसह काँग्रेस(२६ जागा), सीपीआय-एमएल(३ जागा) एमआयएम(१ जागा) हे पक्ष शिल्लक राहीले. अखिलेश कुमार सिंह बिहार भाजपचे प्रवक्ते म्हणाले की, आघाडीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याकडे आमचे नेते वाट पाहत नाहीत. आपआपल्या मतदारसंघात नेत्यांनी निवडणूक अभियान सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.