लखनऊ (उत्तर प्रदेश) - तबलिगी जमातनंतर रोहिंग्यांकडून कोरोनाचा धोका वाढेल, अशी चिन्हे दिसत आहेत. केंद्र सरकारने योगी सरकारला आठ जिल्ह्यात रोहिंग्या मुस्लिम असण्याची शक्यता उपस्थित केली असून त्यांची माहिती मागवली आहे. केंद्राच्या आदेशानंतर योगी सरकारने यासंबंधित कारवाई सुरू केली आहे. शासनाने आठ जिल्ह्यात या लोकांचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत.
उत्तर प्रदेशात आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये जवळपास ५८ टक्के लोक हे या जमातीशी जुळलेले होते. अशात आता रोहिंग्या मुसलमानांना उत्तर प्रदेश येथे येण्याची सूचना सरकारला मिळाली आहे. केंद्र सरकारने उत्तर प्रदेशच्या योगी सरकारकडून आठ जिल्ह्यांची माहिती मागितली आहे. यामध्ये नोएडा, मुजफ्फरनगर, सहारनपुर, मेरठ, अलीगढ़, फिरोजाबाद, मथुरा आणि कानपूर या शहराचा समावेश आहे. केंद्राद्वारे रोहिंग्या मुसलमान येण्यापूर्वी या जिल्ह्यांची माहिती मागवण्यात आली आहे.
काही रोहिंग्या दिल्ली येतील मरकज येथे सहभागी झाले होते. त्यांची माहिती केंद्राच्या एजंसीला मिळाली आहे. त्यानंतर आता केंद्र सरकाने सर्व राज्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. याच क्रमानुसार, डीजीपी मुख्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना अशा रोहिंग्या मुसलमानांविषयी माहिती गोळा करण्याचे आदेश दिले आहेत.
उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ सरकारने इतर जिल्ह्यांनाही सतर्कतेचे आदेश दिले आहेत. अपर मुख्य सचिव गृह अवनीश अवस्थी यांच्याशी फोनवर रोहिंग्यांचा शोध घेण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले, की अशा लोकांचा शोध सुरू आहे.