ETV Bharat / bharat

शांघाय सहकार संस्था बैठक : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाला होणार रवाना - राजनाथ सिंह रशिया एससीओ बैठक

शांघाय सहकार संस्थेचे दोन महत्त्वाचे सदस्य, म्हणजे भारत आणि चीन यांच्यादरम्यान सुरू असलेल्या सीमातणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. चार सप्टेंबरला ही बैठक पार पडणार आहे. याव्यतिरिक्त राजनाथ सिंह हे रशियाचे संरक्षण मंत्री सर्जे शोईजू यांच्यासोबत आणि इतर काही वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबत विविध लष्करी कार्यक्रमांबाबत चर्चा करतील...

Defence minister Rajnath to leave for Russia on Wednesday to attend SCO meet
शांघाय सहकार संस्था बैठक : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाला होणार रवाना
author img

By

Published : Sep 2, 2020, 9:35 AM IST

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज रशियाला रवाना होणार आहेत. तेथे ते शांघाय सहकार संस्थेच्या (एससीओ) बैठकीला हजेरी लावतील. या संस्थेचे दोन महत्त्वाचे सदस्य - भारत आणि चीनदरम्यान सुरू असलेल्या सीमातणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.

चार सप्टेंबरला ही बैठक पार पडणार आहे. याव्यतिरिक्त राजनाथ सिंह हे रशियाचे संरक्षण मंत्री सर्जे शोईजू यांच्यासोबत आणि इतर काही वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबत विविध लष्करी कार्यक्रमांबाबत चर्चा करतील. त्यानंतर ५ सप्टेंबरच्या सायंकाळी ते मायदेशी येण्यासाठी निघतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच रशियामध्ये होणाऱ्या बहुपक्षीय युद्धखेळांमधून भारताने माघार घेतली होती. या खेळांमध्ये पाकिस्तान आणि चीनचा सहभाग असणार आहे. तसेच एससीओच्या बैठकीला चीनचे संरक्षण मंत्री जनरल वेई फेंघे हेदेखील उपस्थित असणार आहेत. राजनाथ सिंह आणि वेई यांच्यादरम्यान द्विपक्षीय चर्चा होऊ शकते का, असे विचारले असता अधिकाऱ्यांनी ही शक्यता फेटाळून लावली.

दरम्यान, रशियाने यापूर्वीच भारत आणि चीनच्या सीमावादामध्ये आपण पडणार नाही, अशी भूमीका घेतली आहे. दक्षिण आशियामधील स्थैर्यासाठी, दोन्ही देशांनी आपापसात चर्चा करुन यावर तोडगा काढावा, असे रशियाने म्हटले होते.

भारत-रशिया द्विपक्षीय चर्चा..

रशियाच्या संरक्षण मंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये राजनाथ सिंह हे रशियाला विविध शस्त्रास्त्रे ही लवकरात लवकर पुरवण्यासंबंधी चर्चा करण्याची शक्यता आहे. तसेच, एके२०३ रायफल्सचे भारतामध्ये उत्पादन घेण्यासंबंधीचा प्रलंबित प्रस्तावही या बैठकीमध्ये अधिकृतरित्या मान्य करण्यात येऊ शकतो. तसेच, राजनाथ सिंह हे रशियाला एस-४०० क्षेपणास्त्रे वेळेत पोहोचवण्यासंबंधी आठवण करुन देऊ शकतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.