अध्यापन करताना जबाबदारी आणि संयम आवश्यक आहे. शाळेतील वातावरण चैतन्यपूर्ण व्हावे आणि त्याची गुणवत्ता कायम राहावी यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) आपल्याशी संलग्न सर्व शाळांचा कायापालट करण्याचे ठरविले आहे. याअंतर्गत, मंडळाने शाळांना उत्कृष्ट बनवण्याचा ध्यास घेतला आहे. शिक्षण केंद्रांना आणि शारिरीक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने कल्याणकारी ठिकाणे बनविणे बंधनकारक केले आहे.
गृहपाठ, गणित आणि विज्ञान प्रकल्पांमुळे मुलांमधील तणावाचे प्रमाण वाढत आहे. उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे गरजेचे आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. शिक्षणाचे वातावरण आनंददायी असेल तर वर्गात अक्षरशः चमत्कार घडून येतील, यात शंका नाही. त्यादृष्टीने, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.
हेही वाचा - 'शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची केल्यामुळे यातून भाषेचे सामर्थ्य दाखवण्याचे काम होईल'
शाळा म्हणजे चिंता आणि तणावापासून मुक्त असलेली सर्वसमावेशक शिक्षण केंद्रे असावीत, यासंदर्भात मंडळाने शिक्षकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना मैत्रीपूर्ण वागणूक देत त्यांच्याशी मनापासून संवाद साधावा, असा आदेश मंडळाने दिला आहे. त्याचप्रमाणे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये ध्यानधारणेची सवय रुजवावी, त्यांना सततच्या मोबाईल फोन वापरापासून परावृत्त करावे, आणि त्यांची एकाग्रता वाढवतील असे विविध उपक्रम राबवावेत, असेही सांगितले आहे.
अभ्यासात प्रावीण्य मिळवणारे आणि सुदृढ विचारसरणी विकसित करणारे विद्यार्थी त्यांच्या कुटुंबातही बदल घडवून आणू शकतात. ते घरात आनंदी राहतील आणि पुन्हा नव्या उत्साहाने शाळेत येतील. शाळा आणि घरात योग्य शैक्षणिक वातावरणाचा अभाव असेल तर विद्यार्थ्यांचे मानसिक स्थैर्य टिकून राहत नाही. पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये ‘परीक्षा पे चर्चा’ असा कार्यक्रम आयोजित केला होता. बोर्डाची परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थ्यांवरील मानसिक दबाव कमी करण्याचा उद्देश त्यामागे होता. सुमारे 2,000 हून अधिक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना या कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी कठीण परिस्थितीला कसे तोंड द्यावे हे पंतप्रधानांनी समजावून सांगितले. यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्याचा विशेष उल्लेख करणे महत्त्वाचे आहे. ते म्हणाले, प्रत्येकाने तंत्रज्ञानावर नियंत्रण मिळवावे मात्र तंत्रज्ञानाचा गुलाम होऊ नये.
हेही वाचा - राज्यातील शाळांमध्ये आता मराठी विषय अनिवार्य
पुरेशा झोपेचा अभाव हे पौगंडावस्थेतील मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे, असा इशारा अमेरिकन मेडिकल असोसिएशनने दिला आहे. तणावपूर्ण मानसिकतेतील विद्यार्थी काही आजारांनी ग्रस्त असू शकतात तसेच त्यांच्यामध्ये लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते. विकसित देशांमध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष यंत्रणा अस्तित्वात असतात. बदलत्या जीवनशैलीमुळे भारतीय विद्यार्थ्यांचे आयुष्य धोक्यात येत आहे. भेसळयुक्त अन्नाच्या अतिरिक्त सेवनामुळे पौगंडावस्थेतील विद्यार्थ्यांमधील मानसिक आणि शारिरीक समतोल ढासळत आहे.
किरकोळ कारणांसाठी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे प्रसंग गेल्या काही महिन्यांमध्ये घडून आले आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने शालेय अभ्यासक्रमात योग, खेळ आणि कलेचा समावेश करण्यास सांगितले आहे. सुदृढ शिक्षणासाठी शाळांमध्ये पाच तत्त्वांचे पालन करावे असे मंडळाने सांगितले आहे. यामध्ये शालेय परिसरात सकारात्मक प्रबलन मंडळाची स्थापना, खेळांना अभ्यासक्रमाचा अनिवार्य भाग बनविणे, आणि सामाजिक माध्यमांवर उत्साही घोषणा करणे अशा काही मार्गदर्शक सूचनांचा समावेश आहे.
हेही वाचा - राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मे पुरवणार
विद्यार्थ्यांच्या शारिरिक आणि मानसिक उत्क्रांतीमध्ये शाळांचा सहभाग आवश्यक आहे. मात्र, त्यांचा मार्ग भरकटला तर देशाची सामाजिक आणि सांस्कृतिक वीण कमकुवत होऊ शकते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी एकट्या शाळेवर नाही. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडून येण्यात घरातील वातावरणाची भूमिका महत्त्वाची आहे. आधुनिक मानसशास्त्रज्ञांच्या मते, खरे शिक्षण म्हणजे मानवी नात्यांची जपणूक करण्याची क्षमता असणे. विद्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक काळात अनेक घटकांमुळे त्रास सहन करावा लागतो. आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करण्यात अडचणी येत असल्यामुळे, अनेक विद्यार्थी शाळा आणि महाविद्यालयांचा कायमचा निरोप घेत आहेत.
तेलुगु राज्यांमध्येही तणावपूर्ण शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तेलंगणा सरकारने शिक्षणाच्या अभिनव पद्धतींवर संशोधन सुरु केले आहे. आंध्र प्रदेशातील शिक्षक शिकवताना खेळणी आणि सर्जनशील पद्धतींचा आधार घेत आहेत. या शैक्षणिक वर्षात या अभिनव पद्धती पाचवीपर्यंत लागू केल्या जातील. शिक्षण पद्धतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी पालकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. जर मुलाला घरात सुरक्षित आणि आनंददायी वातावरण मिळाले, लहान वयात मूल्ये रुजवली, तर तो मोठा होऊन उत्कृष्ट नागरिक होईल.