नवी दिल्ली - देशभरात कोरोनाचा प्रसार होत असतानाही टप्प्याटप्याने शाळा- महाविद्यालये सुरू करण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिली आहे. २१ सप्टेंबरपासून शाळा महाविद्यालये सुरू करण्यास केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. यासंबंधी सरकारने एक नोटीस जारी केली आहे. ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा स्वत:च्या(ऐच्छिक) जबाबदारीवर सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, कोविड नियमावलीचे पालन अनिवार्य आहे.
-
Govt is following a phase-wise unlocking of activities. In days to come, this would involve partial resumption of activities in schools for students of classes 9-12 on a voluntary basis, for taking guidance from their teachers. This would be allowed from Sept 21: Health Ministry pic.twitter.com/QZjkVUDHBx
— ANI (@ANI) September 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Govt is following a phase-wise unlocking of activities. In days to come, this would involve partial resumption of activities in schools for students of classes 9-12 on a voluntary basis, for taking guidance from their teachers. This would be allowed from Sept 21: Health Ministry pic.twitter.com/QZjkVUDHBx
— ANI (@ANI) September 8, 2020Govt is following a phase-wise unlocking of activities. In days to come, this would involve partial resumption of activities in schools for students of classes 9-12 on a voluntary basis, for taking guidance from their teachers. This would be allowed from Sept 21: Health Ministry pic.twitter.com/QZjkVUDHBx
— ANI (@ANI) September 8, 2020
कन्टेन्मेट झोनच्या बाहेर असलेल्या ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा २१ सप्टेंबरपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, जे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी कन्टेन्मेट झोनमध्ये आहेत, त्यांना शाळेत येण्यास मज्जाव आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व परिसर, प्रयोगशाळा सॅनिटाईझ करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. सॅनिटाईझ करण्यासंबंधीची नियमावली केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केली आहे.
विद्यार्थ्यांची हजेरी ऐच्छिक असणार आहे. सोबतच ऑनलाईन क्लासही सुरू राहणार आहेत. शाळेत येणाऱ्या विद्यार्थी शिक्षक कर्मचाऱ्यांना मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची परवानगी आवश्यक असणार आहे.