ETV Bharat / bharat

भविष्यात काळजीपूर्वक बोलावं; 'चौकीदार चोर है' वक्तव्यावरील सुनावणीत राहुल गांधींना सल्ला

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधातील अवमान याचिकेवर आज(बुधवार) सर्वोच्च न्यायालय निर्णय दिला. न्यायालयाच्या निकालावर मत व्यक्त करत असताना राहुल गांधींनी भविष्यात काळजीपुर्वक बोलावे, असे सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना सांगितले आहे.

राहुल गांधी
author img

By

Published : Nov 14, 2019, 10:39 AM IST

Updated : Nov 14, 2019, 6:05 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधातील अवमान याचिकेवर आज(बुधवार) सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. न्यायालयाच्या निकालावर मत व्यक्त करत असताना राहुल गांधींनी भविष्यात काळजीपुर्वक बोलावे, असे सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधीवरील मानहानीचा खटला निकाली काढला आहे. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींने काळजीपूर्वक वक्तव्य केले पाहिजे. राजकीय वादामध्ये न्यायालयाला ओढणे बरोबर नाही. याआधीच राहुल गांधीनी वक्तव्यावरुन माफी मागीतली होती. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयाने आता बंद केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राहुल गांधीना मोठा दिलासा मिळाला आहे.

भाजप खासदार मिनाक्षी लेखी यांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. त्यानंतर सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठाने निर्णय राखून ठेवला होता. या खटल्यात राहुल गांधीची बाजू वकील मनू सिंघवी यांनी मांडली.

राहुल गांधीनी या वक्तव्यावर माफीही मागितली होती. निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत नकळतपणे असे वक्तव्य करण्यात आले, असे म्हणत राहुल गांधीनी माफीही मागितली होती. तसेच सर्वोच्च न्यायलयाने याप्रकरणी राहुल गांधीकडे स्पष्टीकरण मागितले होते आणि लेखी यांच्याकडून तक्रार दाखल झाल्यानंतर नोटीसही पाठवली होती.

सर्वोच्च न्यायालयाने राफेल व्यवहाराप्रकरणीची कागदपत्रे तपासणीसाठी न्यायालयात आणण्याचे आदेश दिले होते. त्यावर राहुल गांधीनी असे म्हटले होते की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून असे दिसते की ' चौकीदारानेच चौरी केली आहे'. यावरही राहुल गांधीनी न्यायालयाच्या निर्णयावर वक्तव्य करण्याचा उद्देश नसल्याचे स्पष्ट केले होते.

न्यायालयानेही यावर एक पत्रक काढून स्पष्टीकरण दिले होते. राफेल वादावरुन दिलेल्या निर्णयात पंतप्रधानांवर कोणतेही वक्तव्य करण्यात आले नव्हते, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

राहुल गांधी पंतप्रधान मोदींची जनमानसात जाणूनबुजून प्रतिमा मलीन करत आहेत. राहुल गांधीनी न्यायालयाच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ काढला, असे मिनाक्षी लेखी म्हणाल्या होत्या. राहुल गांधीच्या वक्तव्यानंतर भाजपच्या एक प्रतिनिधीमंडळाने निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली होती.

Intro:Body:

'चौकीदार चोर है' राहुल गांधीच्या वक्तव्यासंबधी अवमान याचिकेवर आज निकाल    

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधातील अवमान याचिकेवर आज(बुधवार) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. लोकसभेच्या प्रचार अभियानात राहुल गांधीनी पंतप्रधान मोदींना' चौकीदार चोर है' असे संबोधत टीका केली होती. राहुल गांधीनी या वक्तव्यावर माफीही मागितली होती.  

भाजप खासदार मिनाक्षी लेखी यांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. त्यानंतर सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठाने निर्णय राखून ठेवला होता. या खटल्यात राहुल गांधीची बाजू वकील मनू सिंघवी हे मांडत आहेत.

निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत नकळतपणे असे वक्तव्य करण्यात आले, असे म्हणत राहुल गांधीनी माफीही मागितली होती. तसेच सर्वोच्च न्यायलयाने याप्रकरणी राहुल गांधीकडे स्पष्टीकरण मागितले होते आणि लेखी यांच्याकडून तक्रार दाखल झाल्यानंतर नोटीसही पाठवली होती.    

सर्वोच्च न्यायालयाने राफेल व्यवहाराप्रकरणीची कागदपत्रे तपासणीसाठी न्यायालयात आणण्याचे आदेश दिले होते. त्यावर राहुल गांधीनी असे म्हटले होते की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून असे दिसते की ' चौकीदारानेच चौरी केली आहे'. यावरही राहुल गांधीनी न्यायालयाच्या निर्णयावर वक्तव्य करण्याचा उद्देश नसल्याचे स्पष्ट केले होते.

न्यायालयानेही यावर एक पत्रक काढून स्पष्टीकरण दिले होते. राफेल वादावरुन दिलेल्या निर्णयात पंतप्रधानांवर कोणतेही वक्तव्य करण्यात आले नव्हते असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.      

राहुल गांधी पंतप्रधान मोदींची जनमानसात जाणूनबुजून प्रतिमा मलीन करत आहेत. राहुल गांधीनी न्यायालयाच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ काढला, असे मिनाक्षी लेखी म्हणाल्या होत्या. राहुल गांधीच्या वक्तव्यानंतर भाजपच्या एक प्रतिनिधीमंडळाने निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली होती.

Conclusion:
Last Updated : Nov 14, 2019, 6:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.