चेन्नई - तामिळनाडू सरकारने प्लास्टिकबंदी तर जाहीर केली आहे, मात्र गोळा झालेल्या कचऱ्याचे पुढे काय करायचे? असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे. राज्यातील सालेम जिल्ह्यात असणाऱ्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयाने मात्र या प्लास्टिकचा अभिनव वापर सुरू केला आहे. या प्लास्टिकचा वापर करून ते बांधकामाचे साहित्य आणि शोभेच्या वस्तू बनवत आहेत.
जेव्हा कधी त्यांच्याकडे असा प्लास्टिक कचरा गोळा होते, ज्याचा दुसरीकडे कुठे वापर होऊ शकत नाही, तेव्हा त्या प्लास्टिकचा कीस केला जातो. हा कीस त्यानंतर काँक्रीट आणि विटांसारख्या बांधकामाच्या गोष्टींमध्ये वापरला जातो. प्लास्टिकचा वापर करून बनवलेल्या या विटा वजनाला हलक्या असतात, तसेच त्या कोणत्याही हवामानाला पूरक अशा असतात, अशी माहिती स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या प्राध्यापिका डॉ. आर. मालती यांनी दिली.
या महाविद्यालयाचा आदर्श घेऊन जर देशातील सर्व संस्थांनी आणि नागरिकांनी असे प्रयत्न सुरू केले.. तर नक्कीच भारत हा सिंगल-यूज प्लास्टिकमुक्त होईल.
हेही पहा : नो टू सिंगल यूज प्लास्टिक : प्लास्टिक कचरा द्या आणि पोटभर जेवण करा