नवी दिल्ली - काँग्रेस नेता दिग्विजय सिंह यांनी वीर सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या मागणीचा विरोध केला आहे. महात्मा गांधी यांच्या हत्याप्रकरणात सावरकरांचे देखील नाव समाविष्ट होते, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.
'सावरकरांच्या आयुष्याचे दोन पैलू होते. पहिला स्वतंत्र संग्राममध्ये त्याचा सहभाग आणि दुसरा इंग्राजाची माफी मागणे. भाजपने हे विसरायला नको की, सावरकरांचे नाव महात्मा गांधींच्या हत्याप्रकरणामध्ये कट रचण्याच्या आरोपखाली दाखल करण्यात आले होते', असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.
भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी 16 कलमी संकल्पपत्र प्रकाशित केलं. यामध्ये सावरकरांसह महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनाही भारतरत्न मिळावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं भाजपने म्हटलं आहे.