नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत सेल्फी घेणारा सात्विक हेगडे योशल मिडीयावर चांगलाच चर्चेत आला आहे. काल(22 ऑगस्ट) मोदींच्या स्वागतासाठी आयोजित 'हाऊडी मोदी' कार्यक्रमात सात्विक उपस्थित होता. या कार्यक्रमात त्याने सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिकही सादर केले.
कार्यक्रमानंतर मोदी आणि ट्रम्प सोबत फीरत आसताना सात्विक तिथे उभा असलेला ट्रम्प यांना दिसला. ट्रम्प यांना त्याने सेल्फी घेण्याची इच्छा दर्शवली. त्यानंतर मोदी आणि ट्रम्प दोघांनीही या चिमुकल्यासोबत सेल्फी घेतला. व्हाईट हाऊसच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. 'बॉय विथ ट्रम्प अँड मोदी' असे कॅप्शन असलेला हा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
हेही वाचा - मोदी-ट्रम्प यांच्या मैत्रीने भारत-अमेरिका संबंध अधिक मजबूत - निक्की हेले
सात्विक टेक्सासच्या लुई डी ब्रँड्स स्कूलमध्ये सहाव्या वर्गात शिकत आहे. तो मुळचा कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यातील आहे. त्याचे पालक मेधा आणि प्रभाकर हेगडे हे गेल्या 17 वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास आहेत. सात्विकची आई अमेरिकेतील सरकारी शाळेत शिक्षिका आहे.