ETV Bharat / bharat

उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

author img

By

Published : Jan 12, 2020, 3:15 PM IST

उत्तरप्रदेशातील मऊ येथे समाजवादी पक्षाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बिजली यादव असे हत्या करण्यात आलेल्या नेत्याचे नाव आहे.

बिजली यादव
बिजली यादव

लखनौ - उत्तरप्रदेशातील मऊ येथे समाजवादी पक्षाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बिजली यादव असे हत्या करण्यात आलेल्या नेत्याचे नाव आहे. मोहम्मदाबाद गोहना येथील बरजला शेखवलिया गावात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी यादव यांच्यावर गोळ्या झाडल्या.

सकाळी यादव घराबाहेर फेरफटका मारायला गेले असता अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

समाजवादी पक्षाच्या नेत्याची हत्या झाल्याची माहिती मिळताच कार्यकर्ते आणि नेत्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. यादव स्वच्छ प्रतिमेचे नेते होते, त्यांची कोणाशीही शत्रुत्व नव्हते, असे सपाचे नेते राम जतन यांनी सांगितले. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे जिल्हा पोलीस अधिक्षकांनी सांगितले आहे, याप्रकरणी तपास सुरू आहे.

Intro:Body:

उत्तरप्रदेशात सपाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; अज्ञात हल्लेखोर फरार  

लखनौ - उत्तरप्रदेशातील मऊ येथे समाजवादी पक्षाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बिजली यादव असे हत्या करण्यात आलेल्या नेत्याचे नाव आहे. मोहम्मदाबाद येथील बरजला शेखवलिया गावात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या.

सकाळी यादव घराबाहेर फेरफटका मारायला गेले असता अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.    

समाजवादी पक्षाच्या नेत्याची हत्या झाल्याची माहिती मिळताच कार्यकर्ते आणि नेत्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. यादव स्वच्छ प्रतिमेचे नेते होते, त्यांची कोणाशीही शत्रुत्व नव्हते, असे सपाचे नेते राम जतन यांनी सांगितले. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे जिल्हा पोलीस अधिक्षकांनी सांगितले आहे, याप्रकरणी तपास सुरू आहे.   

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.