ETV Bharat / bharat

गांधी १५० : ओडिशाच्या 'हम्मा' गावातील मिठाचा सत्याग्रह... - सविनय कायदेभंग चळवळ

दांडीमधील मिठाच्या सत्याग्रहानंतर, देशभरात सविनय कायदेभंगाची लाट उसळली. यामध्ये ओडिसामधील एक लहानसे गावदेखील मागे नव्हते. जाणून घेऊया हम्मा गावाच्या आंदोलनाची ही रंजक कथा...

गांधी १५०
author img

By

Published : Oct 1, 2019, 5:03 AM IST

भुवनेश्वर - भारताच्या इतिहासातील १९३० हे महत्त्वपूर्ण वर्ष मानले जाते. कारण, याच वर्षी गांधीजींनी ब्रिटीश सरकारचा जाचक मिठाचा कायदा मोडून काढला. दांडी येथील समुद्र किनाऱ्यावर झालेल्या मिठाच्या सत्याग्रहानंतर, देशभरात सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात झाली.

ओडिसाच्या 'हम्मा' गावातील मिठाचा सत्याग्रह...
ओडिशामधील 'हम्मा' गावाचा मिठाच्या सत्याग्रहामध्ये मोलाचा वाटा होता. ओडिशामध्ये उत्कल प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष, एच. के. महताब यांनी मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्त्व केले. देशातील इतर भागांप्रमाणेच, हम्मामधील लोकांनीदेखील मिठाचा कायदा मोडला, आणि या चळवळीत आपला सहभाग नोंदवला. बापूंनी स्वतः या गावात येऊन लोकांशी चर्चा केल्यामुळे गावकऱ्यांना प्रेरणा मिळाली.
बापूंनी याआधीही, १९२७ मध्ये या प्रांताला भेट दिली होती. रंभा गावातील 'रॉयल रेसिडन्स' या हॉटेलमध्ये बापू आणि इतर नेते राहत होते. यावेळी बापूंनी त्यांना भेटायला आलेल्या व्यक्तीला, पुस्तकावर स्वाक्षरी देखील दिली होती.
भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात मिठाचा वाटा मोलाचा आहे. गांधीजींच्या मते मीठ हा सर्व लोकांना एकत्र आणणारा घटक आहे. कारण जात, धर्म, प्रांत, भाषा किंवा पत काहीही असो, प्रत्येक व्यक्ती ही मीठ खातेच.

हेही पहा : 'गांधी विरुद्ध आंबेडकर', की 'गांधी आणि आंबेडकर'?

Intro:Body:

ओडिसाच्या 'हम्मा' गावातील मिठाचा सत्याग्रह...

दांडीमधील मिठाच्या सत्याग्रहानंतर, देशभरात सविनय कायदेभंगाची लाट उसळली. यामध्ये ओडिसामधील एक लहानसे गावदेखील मागे नव्हते. जाणून घेऊया हम्मा गावाच्या आंदोलनाची ही रंजक कथा...

भुवनेश्वर - १९३० हे भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण वर्ष मानले जाते. कारण, याच वर्षी गांधीजींनी ब्रिटीश सरकारचा जाचक मिठाचा कायदा मोडून काढला. दांडी येथील समुद्र किनाऱ्यावर झालेल्या मिठाच्या सत्याग्रहानंतर, देशभरात सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात झाली.

ओडिसामधील 'हम्मा' गावाचा मिठाच्या सत्याग्रहामध्ये मोलाचा वाटा होता. ओडिसामध्ये उत्कल प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष, एच. के. महताब  यांनी मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्त्व केले. देशातील इतर भागांप्रमाणेच, हम्मामधील लोकांनीदेखील मिठाचा कायदा मोडला, आणि या चळवळीत आपला सहभाग नोंदवला. बापूंनी स्वतः या गावात येऊन लोकांशी चर्चा केल्यामुळे गावकऱ्यांना प्रेरणा मिळाली.

बापूंनी याआधीही, १९२७ मध्ये या  प्रांताला भेट दिली होती. रंभा गावातील 'रॉयल रेसिडन्स' या हॉटेलमध्ये बापू आणि इतर नेते राहत होते. यावेळी बापूंनी त्यांना भेटायला आलेल्या व्यक्तीला, पुस्तकावर स्वाक्षरी देखील दिली होती. 

भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात मिठाचा वाटा मोलाचा आहे. गांधीजींच्या मते मीठ हा सर्व लोकांना एकत्र आणणारा घटक आहे. कारण जात, धर्म, प्रांत, भाषा किंवा पत काहीही असो, प्रत्येक व्यक्ती ही मीठ खातेच.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.