भोपाळ - भाजपने हात वर केल्यावर हेमंत करकरेंवर केलेले वादग्रस्त विधान शेवटी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी परत घेतले आहे. आपण केलेल्या विधानाचा देशाच्या शत्रूंना (विरोधी पक्षांना) फायदा होत आहे. त्यामुळे आपण केलेले वक्तव्य मागे घेऊन माफी मागते. ते आपले वैयक्तीक मत होते, असे स्पष्टीकरण ठाकूर यांनी दिले.
दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंना मारून माझे सुतक संपवले, असे म्हणत साध्वी प्रज्ञासिंह यांनी मुंबईचे एटीएस प्रमुख दिवंगत शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. 'मैने कहा था तेरा सर्वनाश होगा' असेही साध्वी म्हणाल्या होत्या. हेमंत करकरे यांनी माझ्यावर केलेली कारवाई ही देशद्रोही आणि धर्मविरोधी होती. तसेच त्यांनी माझ्याबाबत चुकीचा व्यवहार केला असल्याचेही साध्वी यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचे देशभरात पडसाद उमटले आणि त्यांच्यावर टीका होत होती.
-
BJP releases statement over the remarks made against late Hemant Karkare by BJP LS candidate for Bhopal, Pragya Thakur; says, "BJP considers him a martyr. This is Sadhvi Pragya's personal statement which she might have given because of the mental & physical torture she had faced" pic.twitter.com/CNr5n5EbDl
— ANI (@ANI) April 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">BJP releases statement over the remarks made against late Hemant Karkare by BJP LS candidate for Bhopal, Pragya Thakur; says, "BJP considers him a martyr. This is Sadhvi Pragya's personal statement which she might have given because of the mental & physical torture she had faced" pic.twitter.com/CNr5n5EbDl
— ANI (@ANI) April 19, 2019BJP releases statement over the remarks made against late Hemant Karkare by BJP LS candidate for Bhopal, Pragya Thakur; says, "BJP considers him a martyr. This is Sadhvi Pragya's personal statement which she might have given because of the mental & physical torture she had faced" pic.twitter.com/CNr5n5EbDl
— ANI (@ANI) April 19, 2019
साध्वी प्रज्ञासिंह या भाजपकडून भोपाळमधून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या विरोधात त्या भोपाळमधून निवडणूक लढवत आहेत. बुधवारीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी त्यांना अटकही झाली होती.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्या भोपाळ येथून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत. ठाकूर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मालेगाव प्रकरणातील पीडितांकडून त्यांचा विरोध करण्यात येत आहे. तर, त्यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे.