ETV Bharat / bharat

मुलांची आवड वेळीच लक्षात घेऊन त्यांना संधी दिली पाहिजे - सचिन तेंडुलकर - apollo

दक्षिण गोव्यातील केपे येथे तेंडुलकर यांच्या उपस्थितीत अपोलो टायर्सच्यावतीने ऑफरोड रायडिंग इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. यावेळी तेंडुलकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सचिन तेंडुलकर
author img

By

Published : Mar 3, 2019, 8:02 PM IST

पणजी - मुलांमधील बुद्धिमत्ता शोधून योग्यवेळी योग्यसंधी दिली पाहिजे. देशातील पालकांचा कल आता बदलत असून खूल्या मनाने विविध क्षेत्रे स्वीकारली जात आहेत. त्यामुळे मुले भविष्यात यशस्वी होऊ शकतात, असे मत प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी आज केपे येथे केले.

सचिन तेंडुलकर

दक्षिण गोव्यातील केपे येथे तेंडुलकर यांच्या उपस्थितीत अपोलो टायर्सच्यावतीने ऑफरोड रायडिंग इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. यावेळी कंपनीने अध्यक्ष ओंकार कंवर, व्यवस्थापकीय संचालक नीरज कंवर आणि सतीश शर्मा उपस्थित होते. यावेळी तेंडुलकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विदेशात अशा खडतर रस्त्यावर गाडी चालवण्याचा अनुभव घेतला आहे. मात्र, या इव्हेंटच्या माध्यमातून पहिल्यांदाच देशात हा अनुभव घेतला. हा एक वेगळ्या प्रकारचा अनुभव होता. अशा प्रकारची स्पर्धा किमान दोन-तीन महिन्यात एकदा झाली पाहिजे, असेही सचिनने यावेळी सांगितले.

तेंडुलकर यांनी खोल दगडी खाणीत तयार करण्यात आलेल्या ट्रॅकवर ऑफ रोडर्स बनून सहभाग घेतला. सुमारे १०० फुट खोल आणि अस्ताव्यस्त पसरलेल्या या जागेत सरळ भिंत चढण्याबरोबर तीव्र आणि खडतरीत दरीत गाडी उतरून बाहेर काढण्यात आली. यामध्ये देशाच्या विविध भागांतील ५० ऑफरोडर्स कम्युनिटींनी सहभाग घेतला.

Intro:पणजी : मुलांमधील बुद्धिमत्ता शोधून योग्यवेळी योग्यसंधी दिली पाहिजे. देशातील पालकांचा कल आता बदलत असून खूल्या मनाने विविध क्षेत्रे स्वीकारली जात आहेत. आपले तंदुरुस्त राखणे गरजेचे आहे. ज्यामुळे भविष्यात खूप काही चांगले करू शकता, असे प्रतिपादन प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी आज केपे येथे केले.

Body:दक्षिण गोव्यातील केपे येथे तेंडुलकर यांच्या उपस्थितीत अपोलो टायर्सच्यावतीने ऑफरोड रायडिंग इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. यावेळी कंपनीने अध्यक्ष ओंकार कंवर, व्यवस्थापकीय संचालक नीरज कंवर आणि सतीश शर्मा उपस्थित होते.
खडतर आणि डोंगरातील तीव्र कड्याने सहचालक बनून तेंडुलकर यांचे कार्यक्रम स्थळी आगमन झाले. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना तेंडुलकर म्हणाले, विदेशात अशा खडतर रस्त्यावर गाडी चालविण्याचा अनुभव घेतला आहे. देशात आज गोव्यातील या इव्हेंटच्या माध्यमातून पहिल्यांदाच अनुभव घेतला. हा एक वेगळ्या प्रकारचा अनुभव होता. तसंच तो मोठाही होता. रस्ते खडतरीत असले तरी चालक तज्ञ आहेत. या मार्गावर वाहन चालविणारे चालक हे तज्ञ असतात. तसेच अशा प्रकारची स्पर्धा किमान दोन-तीन महिन्यात एकदा झाली पाहिजे.
तर कंपनीचे संचालक नीरज कंवर म्हणाले, होतकरू ऑफ रोडर्स आणि इच्छुक एकत्र यावेत यासाठी एक मंच तयार करण्याचा मानस आहे. ज्यामुळे देशातील दूर्लक्षित प्रदेश या माध्यमातून धुंडाळता येतील.
त्यानंतर तेंडुलकर यांनी खोल दगडी खाणीत तयार करण्यात आलेल्या ट्रँकवर ऑफरोडर्स बनून सहभाग घेत उपस्थितांना एक वेगळा अनुभव दिला. सूमारे १०० फुट खोल आणि अस्ताव्यस्त पसरलेल्या या जागेत सरळ भिंत चढण्याबरोबर तीव्र आणि खडतरीत दरीत गाडी उतरून पुन्हा खडतर मार्गाने बाहेर काढण्यात आली.
यामध्ये देशाच्या विविध भागांतील ५० ऑफरोडर्स कम्युनिटींनी सहभाग घेतला.
...।
व्हिडीओ
सचिन तेंडुलकर ऑफ रोड इन गोवा नावानेही पाठवला आहे.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.