मुजफ्फराबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुजफ्फराबाद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत. मुस्लिमांनी भारतावर राज्य केले. त्यामुळे आरएसएस ही मुस्लीम समाजाचा द्वेष करते, असे इम्रान खान म्हणाले.
इम्रान खान यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील तरुणांना घुसखोरी करण्यासाठी उघडपणे प्रोत्साहन दिले. तरुणांना एलओसीच्या दिशेने जायचे आहे. परंतु, आता जाऊ नका, मी कधी जायचे ते सांगेन, मला प्रथम संयुक्त राष्ट्रात हा मुद्दा मांडू द्या. काश्मीरचा प्रश्न जर सुटला नाही तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होईल, असे ते रॅलीमध्ये म्हणाले आहेत.
हेही वाचा - चिमुकला झाला 'बुलेटराजा', वडिलांनी घरीच तयार केली 'बोन्साय बुलेट'
मी काश्मीरी नागरिकांना निराश करणार नाही. मी काश्मीरचा राजदूत म्हणून जगासमोर जाईन. आतापर्यंत कोणीच भूमिका घेतली नसेल. अशी भूमिका मी घेईल, असे ते म्हणाले. तर काश्मीरमधील नागरिकांवर भारतीय सैनीक अत्याचार करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
हेही वाचा - मध्य प्रदेश : लाच मागितल्यानंतर शेतकऱ्याने नायब तहसीलदाराच्या गाडीला बांधली म्हैस
दरम्यान मुझफ्फराबाद येथे निघालेली इम्रान खान यांची रॅली हा फ्लॉप शो ठरली आहे. त्याच्या रॅलीसाठी रावळपिंडी आणि अबोटाबाद या ठिकाणाहून ट्रकने माणसे आणण्यात आली होती, असे चळवळकर्ते अमजद अयुब मिर्झा यांनी सांगितले आहे.