ETV Bharat / bharat

गुजरात राज्यसभा निवडणूक: 65 पैकी 20 आमदारांना काँग्रेसने हलवले पंचतारांकित हॉटेलात - राज्यसभा उमेदवार भाजप गुजरात

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या 65 आमदारांना मतदारसंघानुसार चार गटात विभागले होते. घोडेबाजार रोखण्यासाठी आमदारांना राज्यातील विविध भागात आणि राज्याबाहेर ठेवण्यात आले होते. या वर्षी मार्च महिन्यापासून काँग्रेसच्या आठ आमदारांनी राजीनामा दिला आहे, त्यामुळे काँग्रेसला 5 आमदारांची आणखी गरज आहे.

राज्यसभा निवडणूक गुजरात
राज्यसभा निवडणूक गुजरात
author img

By

Published : Jun 16, 2020, 9:08 PM IST

नवी दिल्ली - गुजरातमध्ये 19 जूनला राज्यसभेच्या चार जागांसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्ष काँग्रेसने 65 पैकी 20 आमदारांना अहमदाबादेतील पंचतारांकित हॉटेलात हलवले आहे. त्यांना आधी शेजारील राजस्थानातील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते, काँग्रेसचे प्रवक्ते मनिष दोशी यांनी ही माहिती दिली.

.

हे 20 आमदार उत्तर गुजरातच्या मतदारसंघातील आहेत. सौराष्ट्र, मध्य गुजरात, दक्षिण गुजरात मतदारसंघातील आमदार बुधवारी अहमदाबादेत पोहचणार आहेत. त्यांना गांधीनगरमध्ये ठेवण्यात येणार आहे, असे दोशी यांनी सांगितले.

यावर्षी मार्चपासून काँग्रेसच्या 8 आमदारांचा राजीनामा

या महिन्याच्या सुरुवातील काँग्रेसने त्यांच्या 65 आमदारांना मतदारसंघानुसार चार गटात विभागले होते. घोडेबाजार रोखण्यासाठी त्यांना राज्यातील विविध भागात आणि राज्याबाहेर ठेवण्यात आले होते. या वर्षी मार्च महिन्यापासून काँग्रेसच्या आठ आमदारांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे 182 सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसचे फक्त 65 आमदार राहिले आहेत. राज्यसभेत एक उमेदवार निवडून जाण्यासाठी प्रमाणित पद्धतीनुसार 35 मतांची गरज असते.

शक्तीसिन्हा गोहील आणि भारतसिन्हा सोलंकी या काँग्रेसच्या दोन उमेदवारांना निवडून देण्यासाठी काँग्रेसला आणखी पाच आमदारांची गरज आहे. विधानसभेत 103 आमदार असणाऱ्या भाजपने अभय भारद्वाज, रामीलाबेन बारा आणि नरहरी आमिन यांना उमेदवारी दिली आहे. भाजपला तीन खासदार राज्यसभेवर पाठविण्यासाठी 2 आमदारांच्या मतांची गरज आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.