नवी दिल्ली - काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना उपचारासाठी विदेशात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. ६ आठवडे वाड्रा उपचारासाठी अमेरिका आणि नेदरलँडमध्ये राहू शकतात. मात्र, त्यांना इंग्लंडमध्ये जाण्याची परवानगी नाही.
भूखंड अधिग्रहण प्रकरणातील आरोपी असलेल्या रॉबर्ट वाड्रा यांनी मोठ्या आतड्यांत ट्युमर असल्याचे सांगत परदेशात उपचारासाठी जाऊ देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांचा अर्ज दिल्लीतील रॉउज अव्हेन्यू न्यायालयाने फेटाळून लावला होता. मात्र, याप्रकरणी दुसऱ्या सुनावणीदरम्यान, रॉबर्ट वाड्रा यांना परदेशात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी त्यांना नेदरलँड आणि अमेरिकेत जाता येऊ शकते. मात्र, इंग्लंडमध्ये जाण्याची अनुमती नाही.