ETV Bharat / bharat

रॉबर्ट वाड्रा नोएडाच्या मेट्रो रुग्णालयात दाखल - रॉबर्ट वाड्रा हॉस्पिटलमध्ये दाखल

पाठ आणि पायाच्या दुखण्यामुळे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना सोमवारी सायंकाळी नोएडा येथील मेट्रो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रॉबर्ट वाड्रा हॉस्पिटलमध्ये दाखल
author img

By

Published : Oct 22, 2019, 9:58 AM IST

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना सोमवारी सायंकाळी नोएडा मेट्रो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या वाड्रा यांच्या पाठदुखीचा आणि पायाच्या दुखण्यावर मेट्रो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन रॉबर्ट वाड्रा यांच्यावर उपचार करत आहेत.

हेही वाचा... गोंदियात नक्षलवाद्याकडून एकाची हत्या; पोलिसांंचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून झाडल्या गोळ्या

प्रियंका गांधी देखील रुग्णालयात

रॉबर्ट वाड्राच्या रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा देखील रुग्णालयात दाखल झाल्या. प्रियंका गांधी- वाड्रा सुरूवातीला थोडावेळ रूग्णालयात थांबल्यानंतर घरी गेल्या, परंतु रात्री साडेदहा नंतर त्या पुन्हा रुग्णालयात परत आल्या. यानंतर प्रियंका गांधी आपल्या पती रॉबर्ट वाड्रासमवेत रात्रभर हॉस्पिटलमध्ये हजर होत्या.

राहुल गांधी यांचे मेहुणे असलेले रॉबर्ट वड्रा यांची सध्या मनी लाँड्री प्रकरणी चौकशी सुरू आहे. या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने रॉबर्ट वड्रा यांच्यावरही अनेकदा चौकशी केली आहे.

Intro:Body:

https://www.aninews.in/news/national/general-news/noida-robert-vadra-admitted-in-hospital20191022085255/

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.