ETV Bharat / bharat

प्रियांकाला देशातील जनतेच्या हवाली करत आहे, तिला सुरक्षित ठेवा - रॉबर्ट वाड्रा - प्रियांका गांधी वाड्रा

प्रियांका गांधींना शुभेच्छा देताना रॉबर्ट वाड्रा म्हणाले, की भारताच्या जनतेची सेवा करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये सुरू केलेल्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा. सध्या देशात द्वेषाचे आणि सुडाच्या राजकारणाचे वातावरण आहे. मात्र, जनतेची सेवा करणे हे तुझे कर्तव्य आहे हे मला माहिती आहे. आता आम्ही तुला देशाच्या जनतेच्या हवाली करत आहोत. हे सांगताना त्यांनी जनतेला प्रियांकाला सुरक्षित ठेवण्याचे भावनिक आवाहनही केले.

रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा (संग्रहित छायाचित्र)
author img

By

Published : Feb 12, 2019, 12:30 PM IST

नवी दिल्ली - प्रियांका गांधी-वाड्रा राजकारणात सक्रिय झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच सोमवारी उत्तरप्रदेशमध्ये रोड शो करत आपल्या पुढील राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट केली आहे. या पार्श्वभुमीवर प्रियांका यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी प्रियांकाला देशातील जनतेच्या हवाली करत असल्याचे सांगत तिला सुरक्षित ठेवण्याचे भावनिक आवाहन केले आहे. त्यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये हे मत व्यक्त केले.

प्रियांका गांधींना शुभेच्छा देताना रॉबर्ट वाड्रा म्हणाले, की भारताच्या जनतेची सेवा करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये सुरू केलेल्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा. सध्या देशात द्वेषाचे आणि सुडाच्या राजकारणाचे वातावरण आहे. मात्र, जनतेची सेवा करणे हे तुझे कर्तव्य आहे हे मला माहिती आहे. आता आम्ही तुला देशाच्या जनतेच्या हवाली करत आहोत. हे सांगताना त्यांनी जनतेला प्रियांकाला सुरक्षित ठेवण्याचे भावनिक आवाहनही केले.

संबंधित पोस्टमध्ये वाड्रा यांनी पत्नी प्रियांका आपली सर्वोत्तम मैत्रिण, परिपूर्ण पत्नी आणि आपल्या मुलांची सर्वोत्तम आई असल्याचेही नमूद केले आहे.

Intro:सोलापूर : माघ वारीच्या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायाच्यावतीने सोलापूरात पहिल्या रिंगण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. माघी वारीसाठी पंढरपूरकडे पायी चालत जाण्याची मोठी परंपरा सोलापूरमध्ये आहे.पंढरीची वारी जयाचिये कुळी| त्याची पायी धुळी लागो मज॥ या न्यायाने सोलापूर मध्ये ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे यांच्या पुढाकारातून सोलापूरात मोठ्या भक्तिमय वातावरणात हा रिंगण सोहळा पार पडला.. Body:संजय पवार, बळीराम जांभळे यांनी सुरुवातीला रिंगण लावून घेतले.त्यानंतर प्रत्येक दिंडीतील ध्वजाधारी यांनी पालखीला गोल प्रदक्षिणा मारून रिंगण सोहळ्यास प्रारंभ झाला. तुळशी वृंदावनधारी महिलांचे व मृदंगवादकांचे रिंगण झाल्यानंतर विणेकरी व चोपदारांच्या रिंगणास उत्साहामध्ये प्रारंभ झाला. विणेकरी हे प्रत्येक दिंडीतील मानकरी असतात व ते वयोवृद्ध असतात. तरीसुद्धा या वातावरणामध्ये एक वेगळीच उर्मी त्यांच्या शरीरात प्रवेश करून हे सर्वजण धावत रिंगण पूर्ण करतात.तद्नंतर अश्‍वाचे मुख्य रिंगण सुरू झाले आण संपूर्ण वातावरण माऊलीमय झालेले दिसून येत होते.
Conclusion:याप्रसंगी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज, महापौर शोभा बनशेट्टी, आ.प्रणिती शिंदे, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, शिवानंद पाटील, अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजय राजे, शिवरामप्रतिष्ठानचे बापू वाडेकर, अनिकेत पिसे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वारकरी संप्रदायाच्या वैभवामध्ये सर्व दिंडीतील भाविकांनी वारकरी पेहराव परिधान करून नॉर्थकोट मैदानामध्ये आगमन केल्यानंतर उपस्थित मान्यवरांचा जोतीराम चांगभले, बंडोपंत कुलकर्णी, विष्णू लिंबोळे, नागनाथ शिंदे, किसन कापसे यांनी अखिल भारतीय वारकरी मंडळ सोलापूर यांच्यावतीने सन्मान करण्यात आला.यावेळी डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांनी सोलापुरामध्ये वारकर्‍यांसाठी शासनाने वारकरी भवन मिळवून द्यावे असे आवाहन केले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.