नवी दिल्ली - दिल्लीतील राजीव गांधी सुपर स्पेशॅलिटी रुग्णालयातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर प्लाझ्मा थेरपी तसेच अँटी-व्हायरल औषधांनी उपचार करण्यात येत आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) मार्गदर्शक सूचनांनुसार हे उपचार करण्यात येत आहेत.
आयसीएमआरने पॉझिटिव्ह रूग्णांच्या उपचारांसाठी ठरवलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन रुग्णालयाकडून करण्यात येत आहे. तसेच प्लाझ्मा थेरपी आणि अँटी-व्हायरल औषधे देखील वापरत असल्याचे राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. बी.एल. शेरवाल यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले.
राजीव गांधी सुपर स्पेशॅलिटी रुग्णालयात सध्या 270 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आहेत. ज्यात रोज सरासरी २० रूग्ण रूग्णालयात दाखल होत आहेत.
कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपीला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. 7 जून रोजी महाराष्ट्र कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयाने दावा केला आहे की, कोरोनाच्या पेशंटवर प्लाझ्मा थेरपीचा उपचार करण्याचा पहिला प्रयत्न यशस्वी झाला आहे.