नवी दिल्ली - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय हवा खराब असल्याचे विधान केले आहे. त्यावरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 'हाऊडी मोदी' कार्यक्रमामुळे भारतीय हवा खराब झाल्याचे सिब्बल यांनी म्हटले आहे.
कपिल सिब्बल यांनी ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की ट्रम्प यांच्याशी मैत्रीचे तीन परिणाम झाले आहेत. १) कोरोनामुळे मृत झालेल्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह २) भारतीय हवा खराब असल्याचे त्यांचे वक्तव्य ३) भारताला त्यांनी टॅरिफ किंग म्हटले आहे. हा 'हाऊडी मोदी' कार्यक्रमाचा परिणाम आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धी जो बिडेन यांच्याबरोबरील वादविवादात (डिबेट) डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्बन उत्सर्जनावरील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की चीनची हवा पहा. किती खराब आहे. रशिया पाहा. भारत पाहा. हवा खराब आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस हवामान परिषेदेच्या करारामधून बाहेर पडण्याचा यापूर्वी निर्णय घेतला आहे. त्याचे समर्थन करताना ट्रम्प यांनी भारत, चीन, आणि रशियाची हवा खराब असल्याचे म्हटले आहे. कार्बनचे उत्सर्जन करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचे ट्रम्प यांनी संवाद केले. ट्रम्प प्रशासनाच्या काळात गेल्या ३५ वर्षामध्ये कार्बनचे उत्सर्जन सर्वात कमी झाल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला.
दरम्यान, कोरोनामधील मृतांची खरी आकडेवारी भारत, रशिया आणि चीनने दिली नसल्याचा आरोप अध्यक्षपदाच्या निवडणुकीतल उमेदवार जो बिडेन यांनी केले आहे.